आता मोबाईल वरही !

आपला आवडता ब्लॉग आपण आता आपल्या मोबाईलवरही वाचू शकाल. मोबाईलच्या BROWSER वर फक्त www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com टाईप करा व वाचा आपला आवडता ब्लॉग.

नविन वेब साईट.

ब्लॉगरवर बरेच प्रयोग केल्यावर मला काहितरी नविन करावस वाटल.
याचा परिणाम म्हणजे माझी नविन वेबसाईट www.jokesnstuf.com भेट देऊन बघा !

आवडल्यास अवश्य कळवा.

शुक्रवार, २४ मे, २०१३

क्लास !

रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू - नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते  सांगा.
गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण  रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे  चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून  रिक्षा चालवणार.
... गंपू - आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार  आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

तयारी !

पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, " पक्या परिक्षेची तयारी झाली का ?"

पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे."

सोमवार, ४ जून, २०१२

लावा बोली !

एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते....!!!

लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!

१० लाख..!!
...
१२ लाख..!!

१५ लाख..!!

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का...??”

विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो...!!!

गोलू: २० लाख...!!!

mGinger

फेसबुकवर Like करा !

Scan on Your Smartphone.

qrcode