आजीबाईंची दातदुखी.

आजीबाई खेड्यातुन शहरात आपल्या नातवाकडे आल्या आहेत.
एक दिवस आजीबाई तक्रार करतात की त्यांचा दात दुखत आहे. म्हणुन नातू त्यांना दातांच्या डॉक्टरकडे घेउन जातो.
डॉक्टर : आजी तोंड उघडा.
आजीबाई थोडस तोंड उघडतात.
डॉक्टर : आजी अजुन तोंड उघडा.
आजीबाई अजुन थोडस उघडतात.
डॉक्टर : आजी अजुन तोंड उघडा.
आजीबाई वैतागुन : कारे मेल्या अजुन किती तोंड उघडू. दात काढायला काय तोंडात जाउन बसणार आहेस काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा