दोघा पुजार्यां मधे चर्चा सुरु असते.
पहिला : तु देवळात जमा होणार्या पैशाची वाटणी कशी करतोस ?
दुसरा : तसे काही विशेष नाही. मी फरशीवर एक वर्तुळ काढतो व जमा होणारे पैसे लांबून वर्तुळात फेकतो. वर्तुळात राहिलेले माझे तर वर्तुळा बाहेर गेलेले देवाचे. तु काय करतोस.
पहिला : मी ही असेच करतो फक्त वर्तुळाबाहेर गेलेले माझे असतात.
तितक्यात एक माणूस तिथे येतो व त्यांना सांगतो. यापेक्षा सोपा उपाय मी सांगतो. तुम्ही पैसे वर फेका वर राहिलेले देवाचे तर खाली येणारे तुमचे ठेवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा