--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

All Out !

मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलानेमच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.

बायकोचा वाढदिवस !

बंड्या : तुझा डोळा का सुजलाय रे?



पप्पू : काल माझ्या बायकोचा वाढदिवस होता. मी तिच्यासाठी केक आणला होता.


बंड्या : अरे, त्याचा डोळा सुजण्याशी काय संंबंध?


पप्पू : अरे त्या केकवाल्यानं घोळ घातला. माझ्या बायकोचं नाव तपस्या आहे, त्या मूर्खानं हॅप्पी बर्थ-डे 'समस्या' लिहिलं

लक्षात राहात नाही !!!

विद्यार्थी : सर, मी अभ्यास करतो, पण माझ्या काही लक्षात राहात नाही.

सर : बरं, सांग गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता?

विद्यार्थी : मागच्या शुक्रवारी


सर : हे कसं लक्षात आहे?

विद्यार्थी : सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...