--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

गैरसमज !

बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.

बायको : काय, कोणता गैरसमज ?

नवरा : मी झोपलो होतो.

सुख !

सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?"

ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही."

सांता : कां ?

ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !

आंधळा !

आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे.

बाईचा नवरा भिकार्‍याला १० रुपये देतो.

बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ?

नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !

ट्रेनर !

एका प्रसिद्ध मासिकासाठी काम करणार्‍या फोटोग्राफरला एकदा जंगलात लागलेल्या आगीचा चांगला फोटो काढायचा होता. त्याने बराच प्रयत्न केल्यावरही चांगला फोटो मिळेना, प्रत्येक फोटोत आग दिसण्या ऎवजी धुरच दिसायचा, तेंव्हा त्याने आपल्या संपादकांना फोनवरुन कळवले कि जंगलात आग लागली आहे व आगीचा फोटो विमानातुनच काढणे शक्य आहे तर लौकरात लौकर विमानाची व्यवस्था करा.
संपादक म्हणाले लगेच करतो तु विमानतळावर जा.
फोटोग्राफरला घाई झाल्याने त्याने विमानतळावर पोहोचल्यावर सोपस्कार पूर्ण केले व एका लहान विमानात जाऊन बसला व पायलटच्या जागेवर बसलेल्याला म्हणाला चल लगेच उडूया.
पायलटने विमान आकाशात नेल्यावर त्यांनी आगीच्या दिशेने ते वळवले.
फोटोग्राफर म्हणाल चल आता विमान जरा खाली घेऊन ३ ते ४ फेर्‍या मार.
पायलट म्हणाला," का ?"
फोटोग्राफर," मी फोटोग्राफर आहे, मला या आगीचे जवळून फोटो काढायचे आहेत."
"अरे बापरे, मला वाटले तुम्ही नविन ट्रेनर आहात व मला आज विमान कसे उतरवायचे हे शिकवणार आहात.", 

स्माईल प्लीज !!!

आमचा फोटो काढाताहेत हे काका ! त्यांनी स्माईल प्लीज म्हटलय !!!
तुम्ही हव तर आमच्या मागे उभे रहा !!!

थैमान.


काल पुन्हा एकदा मुंबईत अतिरेक्यांनी घातलेल्या थैमाना नंतर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला शांत रहाण्याचे आवाहन केले आहे.

महोदय, तुम्ही शांत बसा व आम्ही पण शांत बसतो.

या घटनेनंतर अतिरेक्यांचा निषेध करण्या ऎवजी आपण आपल्या राजकारण्यांचा निषेध करुया व या बॉंबस्फोटात मृत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहूया.

सामान्य माणुस अजुन काय करु शकतो ?

अंतर !

सुरेशचा एका आजोबांसोबत वाद सुरु होता. तो म्हणाला,"आजोबा, तुमचा काळ वेगळा होता. आज बघा आमच्याकडे फास्ट कार आहेत, टिव्ही आहेत ज्यावर कायम काहीतरी सुरु असते, जेट विमाने आहेत, अंतराळ प्रवासासाठी वाहने आहेत आणि.................

सुरेश थांबलेला बघुन आजोबा म्हणाले,"हे सर्व आमच्या पिढीने शोधले तुमच्या पिढीसाठी ! तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !"

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...