--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

कॉपी ?

         दोन महिन्यांपुर्वी आमच्या कंपनीत एक नविन साहेब आले. त्यांना ऑफिसचे प्रत्येक काम आपल्या सेक्रेटरीला सांगायची सवय असल्यामुळे कोणतीही मशिन चालवता येत नाही.
         परवा त्यांची सेक्रेटरी रजेवर होती व मला ते संध्याकाळी पेपरचे बारिक तुकडे करणार्‍या पेपर श्रेडर पुढे ऊभे दिसले. त्यांना बघुन मी विचारल ,"सर, काही मदत हविय का ?"

साहेब : हो, मला ही मशिन चालवता येत नाही. जरा मदत कर ना.

मी त्यांच्या हातातला कागद घेतला, मशिन मध्ये घातला व स्टार्ट बटन दाबली. बटन दाबताच कागद आत गेला.

कागद आत गेलेला बघुन साहेब मला म्हणाले," अरे, हा एक अतिशय महत्वाचा कागद आहे मला याच्या दोन कॉपी दे"

श्रमदान.

सांता : अरे बांता इतके दिवस कुठे गेला होतास ?

बांता : अरे मी श्रमदान करायला गेलो होते.

सांता : श्रमदान ? कुठे ?

बांता : जेल मधे . अरे मला सहा महिने सश्रम कारावास झाला होता ना.

नकार.

"तु माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का ?" मंगेश.

साधना,"मी तुला या अगोदरच सांगितले आहे. मी तयार नाही."

"मी दोन दिवस वाट बघतो. अन्यथा मी विहार लेक मधिल बर्फात मधोमध एक भोक करणार व त्यात स्वत:ला बुडवून घेणार." मंगेश.

साधना,"अरे, मुंबईत इतकी थंडी कधिच नसते कि विहार लेक मधिल पाण्याच बर्फ होईल."

"तर मी अशी थंडी पडायची वाट बघणार."

सेवानिवृत्ती.

३५ वर्षांच्या प्रदिर्घ सेवे नंतर बाळाभाऊ सेवानिवृत्त होणार होते. गेली २० वर्षे त्यांच्या कार्यालयाचे ते प्रमुख होते. शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या सर्व सहकार्‍यांना पार्टी द्यायचे ठरवले.
खाणे सुरु असताना बाळाभाऊंनी सर्वांना एक कोरा कागद दिला व सांगितले कुणीही भाषण करणार नाही, प्रत्येकाने आपल्या भावना त्या कागदावरच लिहायच्या आहेत.

प्रत्येकाने त्यावर आपल्या साहेबांबद्दल लिहिणे सुरु केल.

एकाने लिहिल," साहेब आपण गेल्यावर आपले कार्यालय नेहमी सारखे वाटणार नाही."

दुसर्‍याने लिहील, " साहेब, मला काहीच सुचत नाहिये."

एक एक कागद वाचत बाळाभाऊ राजाभाऊंकडे गेले. म्हणाले राजा आपण गेली १८ वर्षे एकत्र आहोत, तुला काय वाटते रे.

लगेच राजाभाऊंनी लिहिल, " आज मला फार आनंद होत आहे, मी गेली पंधरा वर्षे या दिवसाची वाट बघत होतो ."

तपासणी !

एकदा एक शेतकरी आपले शेत नांगरत होता.
त्याच्या शेताजवळ एक मोटार थांबली व त्यातुन एक माणूस उतरला. तो माणूस शेतकर्‍याच्या दिशेने चालत आला व म्हणाला मला तुमच्या शेताची व झोपडीची तपासणी करायची आहे.

शेतकर्‍याने त्याला परवानगी दिली व म्हणाला साहेब शेताच्या त्या दिशेला जाऊ नका.

मला सांगू नका, माझ्याकडे तुमचे शेत तपासायचे पत्र आहे.


शेतकर्‍याचे सांगणे न ऎकता तो माणूस शेतकर्‍याने सांगीतले त्याच दिशेला जाऊ लागला.

थोड्यावेळाने त्या दिशेकडून किंचाळ्या ऎकू येऊ लागल्या व तो माणूस बाहेर जायचा रस्ता शोधत होता.

त्याच्या कडे बघत शेतकरी ओरडला," माझ्या बैलाला दाखवा ते पत्र."

सिनेमा.

कायमच खेड्यात राहिलेले छगनराव एकदा शहरात आले.
घरी सर्वांनी एक सिनेमा बघायच ठरवल.
सिनेमा सुरु झाला, सर्वच मजा घेत होते.




आणि



सिनेमात एक वाघ प्रेक्षकांच्या दिशेने येत आहे असा सीन आला.
वाघ प्रेक्षकांकडे येत आहे हे बघुन छगनराव जोरजोरात किंचाळायला लागले.
छगनरावांना सांगण्यात आल घाबरु नका हा सिनेमा आहे.

छगनराव म्हणाले," होय, मला माहित आहे. पण त्या वाघाला माहित आहे का ?"

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...