--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

आम आदमी के साथ..... थट्टा.

आघाडी शासनाने सामान्य माणसांची थट्टा करायचच ठरवल आहे. प्रस्तुत तक्त्या वरुन हेच सिद्ध होत नाही कां ?
आपले जाणते ज्योतिषी महागाई कमी होण्याबद्दल पुढील भविष्य वाणी कधि करतात याची वाट बघावी !

गणराज्य दिनाच्या शुभेच्छा.


सर्व वाचकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा.

भारताला भ्रष्टाचार मुक्त करायची शपथ घेउया,
भारत मातेला वैभवाच्या शिखरावर न्यायला भ्रष्टाचार एक अडथळा आहे,
या सर्व मिळून तो दूर करुया.

भारत माता कि जय.


लाच.

वकिल रागारागाने पक्षकाराकडे गेला.
वकिल : अरे तु आपल्या न्यायामूर्तींकडे लाच पाठवलीस ?
पक्षकार : होय.
वकिल : तुला माहित आहे ते कसे आहेत ? त्यांना हे आवडणार नाही.
पक्षकार : होय.
वकिल : तरिही तु अस का केलस ? आपण आता हरणार.
पक्षकार : नाही, मी लाच आपल्या विरोधी पक्षाच्या नावे पाठवली !!!

मंदी !


मंदीच्या काळात एका सिंधी व्यापार्‍याने काढलेला उपाय.
व्यापारी रात्री घरी आला व मुलांना म्हणाला, आज रात्री जो न जेवता झोपेल त्याला मी ५ रुपये देणार.
त्या रात्री त्याची मुले ५- ५ रुपये घेऊन झोपली.
दुसर्‍या दिवशी सकाळी तो मुलांना म्हणाला, "जो ५ रुपये देईल त्यालाच नाश्ता मिळणार."
मुलांनी ५-५ रुपये देऊन घरातच नाश्ता घेतला.

१००० पानांचे पुस्तक.

एक हजार पानांचे पुस्तक वाचायला किती वेळ लागेल ?


लेखक : सहा महिने.




डॉक्टर : दोन महिने.




वकिल : एक महिना.

अभियंता : परिक्षा कधि आहे ते सांगा. रात्रभरात वाचुन काढू.

परिक्षा !

कॉलेजमध्ये आमच्या वर्गात चार अतिशय व्रात्य मुले होती.
चाचणी परिक्षेच्या अगोदर चौघेही रात्री बर्‍याच वेळ खेळत होते. दुसर्‍या दिवशी परिक्षे आधि चौघेही प्राचार्यांकडे फारच खराब झालेले घाणेरडे कपडे घालून गेले व काल रात्री आम्ही एका लग्नाला गेलो होतो व परत येताना आमच्या कारचे टायर फुटल्याने आमची ही अवस्था झाली आहे असे प्राचार्यांना सांगितले.
प्राचार्य म्हणाले बर पण चारच दिवसांनी मी तुमची चौघांची चाचणी घेणार. असे ऎकून मुले फार खुष झाली.
चौथ्या दिवशी चौघेही परिक्षेला गेले.
प्राचार्य त्यांना म्हणाले ही परिक्षा मी काही परिस्थीती मुळे पूढे धकलली आता तुम्ही तयारी करुन आला असाल तर मी परिक्षा घ्यायला तयार आहे. पण चौघांनाही वेगवेगळ्या खोलीत बसवणार व फक्त दोनच प्रश्न विचारणार.
दोनच प्रश्न ऎकून मुलांना आनंद झाला.
मुलांना चार खोल्यात बसवण्यात आले व प्रश्नपत्रिका देण्यात आली.
त्यातील प्रश्न होते.

प्रश्न १ तुमचे नाव काय आहे ? (०४ गुण)
प्रश्न २ तुमच्या कारचा कोणता टायर फुटला होता ? (९६ गुण)
अ. समोरचा डावा.
ब. समोरचा उजवा.
क. मागचा डावा.
ड. मागचा उजवा.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...