--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

मी श्रीमंत कसा झालो !

एकदा एका श्रीमंत माणसाची मुलाकात झाली त्यांना विचारल,"तुम्ही श्रीमंत कसे झालात ?"
श्रीमंत माणूस : आम्ही फार गरीब होतो. मला नोकरी करायची नव्हती व व्यवसाय करायचा होता. मी एकदा माझ्याकडे असलेल्या वीस रुपयांतुन काही फळे घेतली. त्यांना दिवसभर घासुन पुसुन साफ केल व संध्याकाळी चाळीस रुपयांना विकले. दुसर्‍या दिवशी त्या चाळीस रुपयांची फळे घेतली व साफ करुन सत्तर रुपयांना विकली. असे मी महिनाभर करित होतो.
मी : असे तुम्ही किती कमावलेत ?
श्रीमंत माणूस : महिन्याभरात मी पन्नास रुपये कमावले.
मी : तर श्रीमंत कसे झालात ?
श्रीमंत माणूस : दिड महिन्यात माझे सासरे वारले त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने एक कोटी ठेवले होते !!!

सोय.

एकदा मी एका दुकानात गेलो होतो. बरिच गर्दी असल्याने मला थांबाव लागणार होत. काही वेळाने तो दुकानदार काहीसा काळजीत दिसला, कारण त्याचा एक ग्राहक त्याचा मोबाईल फोन तिथे विसरला होता.
थोड्यावेळाने दुकानदाराला सुचल कि त्यातील काही क्रमांक बघावे व मोबाईल सापडल्याचा निरोप द्यावा. एक नंबर "आई" नावाने होता.
दुकानदाराने "आई"ला फोन करुन मोबाईल त्याच्याकडे असल्याच सांगीतल.
थोड्या वेळाने "आई"चा फोन आला व तिने सांगितल, "बेटा तु तुझा फोन या दुकानात विसरला आहेस."

मैत्री !

सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
नरेश : माझ्याकडे खरच आहेत !!!

आभार.

आज आपला "सर्वोत्तम मराठी विनोद" हा ब्लॉग पहिल वर्ष पुर्ण करुन दुसर्‍या वर्षात प्रवेश करित आहे. या वर्षात सुमारे ७२००० हिट्स मिळाल्या याचा अत्यंत आनंद होत आहे. वाचकांना ब्लॉग आवडला याची ही पावती आहे.
यादरम्यान बर्‍‍याच जणांनी ई-मेल द्वारे सुधारणा सांगीतल्या. तसेच विनोद आवडताता हेही कळवले.
आपला सर्वांचा मी मनापासुन आभारी आहे.
आपला लोभ असाच कायम राहिल ही अपेक्षा. तसेच विनोदांचा दर्जासुध्धा जपला जाईल याची खात्री बाळगावी.

सरदार !

तुमचा एक मित्र सरदार आहे.
बर.
त्याला शनिवारी हसवायचे आहे.
तुम्ही काय कराल.
.
.
.
.
.
.
.
.
.
विचार करा
.
.
.
.
.
त्याला मंगळवारी जोक सांगा !!!!!

भविष्य !

शिक्षीका : मुलांनो, कोणी एखाद्या कागदाकडे बघुन भविष्य सांगू शकते कां ?
बाळू : हो.
शिक्षीका : कोण ?
बाळू : माझी आई.
कस काय ?
बाळू : माझ्या गुणपत्रिकेकडॆ बघुन आई सांगू शकते बाबा घरी आल्यावर काय होणार.

अब्जाधिश !

शिक्षक : मुलांनो चला अपल्या वह्या काढा. पेन हाती घ्या आणि चला "मी अब्जाधिश झालो तर" या विषयावर निबंध लिहा.
सर्व मुले शांतपणे लिहायला लागतात. पण बाळू तसाच बसला असतो.
शिक्षक : काय झाले बाळू तुला ? असा का बसला आहेस. चल लिहायला सुरुवात कर.
बाळू : नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...