--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

उद्याचे काम आजच !

आई आज बाईंनी शिकवलं उद्याच काम आजच कराव. मी पण यापुढे असच वागणार.
शाब्बास बेटा.
तर आई मी अस करतो उद्याचे चॉकलेटपण आजच संपवून टाकतो !!!

कारणे !!!

आई : अरे सुहास ऊठ. तुला कॉलेजला जायचे आहे ना ?






सुहास : आई मी आज कॉलेजला नाही जाणार.






आई : सुहास तुला कॉलेजला जावच लागेल.






सुहास : नाही आई मी नाही जाणार.






आई : मला दोन कारणे सांग तुला का नाही जायचं .






सुहास : सगळी मुलं माझा राग करतात. सगळे शिक्षकही माझा राग करतात.






आई : चल ऊठ आणि तयार हो.






सुहास : मला दोन कारणे सांग. मी कॉलेजला का जावं.






आई : तुझं वय आता ५५ वर्षे आहे . तू कॉलेजचा प्राचार्य आहेस.

लग्नाची एक्सपायरी !

बायको : अहो, काय करताय ?



नवरा : काही नाही गं.



बायको : नाही, मी बघतेय मघापासून.......



नवरा : काय, काय बघतेयस मघापासुन ?



बायको : अहो, तुम्ही असे आपले मॅरेज सर्टिफीकेट का बघताय गेल्या तासाभरापासुन ?



नवरा : काही नाही गं ! बघतोय कुठे एक्सपायरी डेट आहे का त्यावर !!!

तिरंगा.

एकदा मुंबईतल्या सगळ्या भैय्या लोकानी स्वातंत्र्यदिन साजरा करायचे ठरवले.

एका भैय्यावर तिरंगा झेंडा विकत आणायची जबाबदारी सोपवण्यात आली.

भैयाने आपल्यासोबत आणखी एका भैय्याला घेतले.

सर्वच दुकानात सारखेच झेंडे बघून ते वैतागले.

शेवटी त्यांनी कंटाळून एका दुकानदाराला विचारले, " इसमे कोई दूसराभी रंग होगा तो देना. सबही लोग एकही रंगका तिरंगा क्यों बेच रहे है ? "

विमा !

एक विमा एजंट आपल्या बायकोला कार चालवणे शिकवत होता. वेग थोडा वाढल्यावर त्याच्या लक्षात आले कि गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. त्याने बायकोला तशी कल्पना दिली.

बायको : आता मी काय करू ?

एजंट : काहीही कर पण लक्षात ठेव फार महागड्या वस्तुला धडक देवू नको. त्याची भरपाई आपल्याला महागात पडेल !

घाई

डॉक्टर आपल्या दारुड्या मित्राला : अरे, तुला माहितेयना दारू पिणार्‍याला दारू हळू हळू मारते.
मित्र : हो, मला माहित आहे. म्हणून तर पितो. मरायची घाई कोणाला आहे ईथे !!!

हा ! हा !! हा !!!

एक पारितोषीक वितरण समारंभात बोलावलेल्या एका राजकिय नेत्याने म्हटले," आजच्या या क्रिडा स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभाला मला बोलावल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. मला सांगण्यात आले आहे कि या स्पर्धेत एकूण २६ संघांनी भाग घेतला व फायनलला दोन संघात फार चांगल्या वातावरणात स्पर्धा झाली."
" मला या गोष्टीचे फार फार वाईट वाटले कि एकूण २६ संघांनी स्पर्धेत भाग घेतल्यावरही फायनलला एकूण दोनच संघ पोहोचले"
" मी आयोजकांना सांगु इच्छितो कि पुढच्या वर्षी या स्पर्धेत आणखी जास्त संघांनी भाग घ्यावा व फायनलला पोहोचणार्‍या संघांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढावी."

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...