--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: शिक्षक
शिक्षक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रॉकेट पासून काय शिकायला मिळते ?

 शिक्षक : रॉकेट पासून काय शिकायला मिळते ?

विद्यार्थी : बुडाला आग लागल्या शिवाय आयुष्यात उंची गाठता येत नाही . 

उत्तर ऐकून शिक्षक १० लिटर पाणी प्यायले  !!!

X

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्याडब्यात चपाती बुडवून खात होते...

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही...

गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!

उशीर

शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला ?

चिंटू: आई बाबा भांडत होते,

शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध ? 

चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.

बाळूचा अभ्यास.

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक :  बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस .  तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?



बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

प्रार्थना.

शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?
राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.

परंपरा.

शिक्षक : शाम, तु वर्गात फार बोलतोस.
शाम : ती आमची परंपरा आहे.
शिक्षक : याचा अर्थ काय आहे ?
शाम : माझे आजोबा रस्त्यावर फेरीवाले होते, आणि वडिल शिक्षक.
शिक्षक : आणि आई काय करते ?
शाम : ती एक स्त्री आहे.

अब्जाधिश !

शिक्षक : मुलांनो चला अपल्या वह्या काढा. पेन हाती घ्या आणि चला "मी अब्जाधिश झालो तर" या विषयावर निबंध लिहा.
सर्व मुले शांतपणे लिहायला लागतात. पण बाळू तसाच बसला असतो.
शिक्षक : काय झाले बाळू तुला ? असा का बसला आहेस. चल लिहायला सुरुवात कर.
बाळू : नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.

तिसर विश्व युध्द !

शिक्षक : मुलांनो तिसर विश्वयुद्ध झाल तर काय होईल ?
बाळू : सर फार गंभीर परिणाम होतील.
शिक्षक : सांग काय परिणाम होतील ?
बाळू : सर ईतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.

माकड !

वर्गात शिक्षक भुगोल शिकवत असतात.
अफ्रिका व अफ्रिकेतील माकड हा विषय असतो. सरांच्या लक्षात येते कि मंदारच लक्ष वर्गात नाही.
तेंव्हा ते म्हणतात , " अरे मंदार तुझे लक्ष कुठे आहे ? लक्ष माझ्याचकडे ठेव नाहीतर तुला कळणारच नाही माकड कसे असते. "

बंधुप्रेम !

शिक्षक : मुलांनो निष्पाप आणि मुक्या प्राण्यांवर आपण प्रेम करायला हवे, मी जर कुणा माणसाला एका निष्पाप गाढवाला मारतांना बघितले तर मी काय करायला हवे ?
वर्ग : त्याला थांबवायला हवे .
शिक्षक : बर मी त्याला मारण्यापासुन थांबवले तर हे काय दाखवते ?
वर्ग एका स्वरात : बंधुप्रेम !!!

शोध.

शिक्षक : मुलांनो, फळ्याजवळ जाऊन नकाशावर अमेरिका कुठे आहे हे कोण दाखवू शकते कां ?

बाळू : सर, मी दाखवतो.

(बाळू अमेरिका कुठे आहे ते बरोबर दाखवतो.)

शिक्षक : शाब्बास बाळू.

शिक्षक : आता सांगा, मुलांनो अमेरिकेचा शोध कुणी लावला.

सगळा वर्ग एका स्वरात : बाळूने SSSSSSSSS.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...