मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

August, 2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाहिरात !

बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.
त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले. त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले," जाहिरातीत छापा "बळवंतराव आज सकाळी अचानक गेले." पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा. बायको म्हणाली, तर छापा,"बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे."

नविन नवरा .

नविन नवरा व नविन कुत्रा यात काय फरक आहे ?


नविन कुत्रा एका वर्षाने पण तुमच्याकडे बघुन आनंद दाखवतो........ !

रेबीज.

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.
पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?
डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?
पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.