मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

March, 2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धन्यवाद !

आज बरेच दिवसांनी ब्लॉग काऊंटर बघितला .आकडा ३०२३५० दाखवत होता. आकडा बघुन आनंद झाला पण एक जाणवले आपले वाचक आलेच नसते तर ?

आज वाचकांच्याच मदतीने व आपल्या अपार प्रेमाने हा आकडा गाठणे शक्य झाले. आपले आभार कसे मानावेत हेच कळत नाही.

विनोद वाचताना बर्‍याच वाचकांनी कान पण धरला, कारण त्यांना विनोद आवडले नाहीत. कान धरणार्‍या वाचकांचे पण आभार. त्यांच्याचमुळे विनोदांचा दर्जा खाली उतरला नाही.

मायबाप वाचकांचे असेच प्रेम भविष्यातही लाभो हिच प्रार्थना.

धन्यवाद.

वत्सला काकुंचा विमान प्रवास !

वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,"अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?"


पायलट म्हणाला, "खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही."

थालीपीठ.

वत्सलाबाईंनी बबनरावांना विचारले," आज रात्री जेवायला काय करु ?"
बबनराव, "छान कांद्याचे थालीपीठ करतेस का ?"

वत्सलाबाई, "हो करते, बरेच दिवसात केले नाहित ना ?"

वत्सलाबाई स्वयंपाक घरात गेल्यावर थोड्या वेळाने बबनराव पण तिकडे गेले.

अग अग कांदा बारिक चिरलास ना ? आणि हो त्यात थोडे तिळ पण घाल. आणि ऎकल का मोहन जरा जास्तच घाल थालीपीठ छान खुसखुशीत होतात. तव्यावर पण थोडे तेल जास्त लाव बर का .

वत्सलाबाई चिडल्या व म्हणाल्या मला काय थालीपीठ येत नाहित काय ?

मला काय कार चालवता नाही येत का ?