--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: आनंदाची घटना !

आनंदाची घटना !

एकदा एक सरदार मरण पावला.

त्याच्या अंत्यविधीची सर्व तयारी झाली. बॅंड बोलावण्यात आला. घरुन निघाल्यावर अंत्ययात्रेत सर्व बॅंडच्या तालावर नाचू लागले. भांगडा करु लागले.

रस्त्याने बघणारे नवल करत होते कि अशी अंत्ययात्रा कधी बघितली नाही.

राजाभाऊंनी एका सरदाराला बाजूला घेऊन विचारले," अरे ही अंत्ययात्रा असताना तुम्ही लोक असे का नाचताहात ?"

सरदार म्हणाला," पहिल्यांदाच कुणी सरदार ब्रेन ट्युमरने मेला, आता कोणी म्हणणार नाही सरदारांना ब्रेन नसते." आणी तो परत नाचायला लागला.

२ टिप्पण्या:

  1. नमस्कार दिनेश,

    आपल्या सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes या ब्लॉगवरील तळटीप वाचली, ज्यात साहित्यचोरीप्रकरणाचा उल्लेख आहे. सदर साहित्यचोरी उघडकीला आणण्याचे कारण - साहित्यचोर श्री. महेंद्र कुलकर्णी यांच्या ब्लॉग वरचे साहित्य चोरुन आपल्या ब्लॉगवर / साईटवर प्रकाशित करत होता हे नसून, तो साहित्यचोर माझे स्वलिखित लेख त्याच्या ब्लॉगवर प्रकाशित करत होता, हे आहे.

    आपण लिहिलेल्या वाक्यामुळे इतर ब्लॉगर्सचा गैरसमज होऊ शकतो. भविष्यात त्यांच्या ब्लॉगवरील साहित्याची चोरी झाली, तर ते चोरीचा छडा लावण्याची विनंती मला करतील पण स्वत: पुढाकार घेणार नाहीत.

    आमच्या ब्लॉगवरील साहित्यचोरीचा तपास करा, अशा आशयाची बरीच ईमेल्स मला बोक्या सातबंडे प्रकरणानंतर आली आहेत मात्र चोरीप्रकरणात ब्लॉगर स्वत: पुढाकार घ्यायला उत्सुक नसतात. कुणाच्या ब्लॉगवरील साहित्याची चोरी होत असेल, तर शक्य असेल ते सर्व सहकार्य मी द्यायला तयार आहे पण दुसर्‍याकडून मदत हवी असेल, तर आधी स्वत:च स्वत:ला मदत करायला हवी हेही ब्लॉगर्सनी ध्यानात घेतले पाहिजे. कारण मदत करणारादेखील आपले काम बाजूला ठेवून, वेळ व प्रसंगी पैसा खर्च करून त्यांना मदत करत असतो.

    धन्यवाद.
    कांचन कराई

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार कांचनताई,
    मला सदर वेब साईट वर माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केलेले बरेच विनोद सापडले. त्या नंतर मी ही तळटीप टाकली होती. मला कुणी विनोद कॉपी केल्याच दु:ख नाही पण अशी सरळ सरळ कॉपी करायची सवय योग्य नाही असे मला वाटते.
    आपण बोक्या सातबंडेच्या वेळेस जे काम केले ते खरच अभिनंदनीय आहे व मला याचे कौतुक वाटले म्हणुन मी आपला उल्लेख केला.
    माझे विनोद कुणी कॉपी करित असेल तर त्याने माझ्या ब्लॉगचा त्यात उल्लेख करावा इतकिच माफक अपेक्षा आहे.

    उत्तर द्याहटवा

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...