मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

December, 2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सर्वच आनंदात !

तीन मोठ्ठे राजकिय नेते दिल्लीला एकाच विमानात बसतात. विमान आकाशात जाते.

त्यातला सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणतो," मी शंभर रुपयाची नोट खाली फेकतो, ज्याला सापडेल तो खुष होणार."

विरोधी पक्षाचा नेता म्हणतो," दहा हजार फेका जास्त लोक खुष होतील."

तिसर्‍या पक्षाचा नेता म्हणतो," तुम्हीच विमानातुन उडी टाका अजुन जास्त लोक खुष होतील."

मागे बसलेला एक प्रवासी म्हणतो,"तुम्ही सर्वच उडी टाका, संपुर्ण भारत खुष होईल."

शिक्षण ?

एकदा एक वयस्क माणुस एका शाळेत गेला व मुख्याध्यापकांना म्हणाला," मला लिहीता वाचता येत नाही, मला शिकवाल का ?"

मुख्याध्यापक म्हणाले," हॊ आम्ही शिकवू, फक्त हा अर्ज भरुन द्या."

आनंदाची घटना !

एकदा एक सरदार मरण पावला.
त्याच्या अंत्यविधीची सर्व तयारी झाली. बॅंड बोलावण्यात आला. घरुन निघाल्यावर अंत्ययात्रेत सर्व बॅंडच्या तालावर नाचू लागले. भांगडा करु लागले.
रस्त्याने बघणारे नवल करत होते कि अशी अंत्ययात्रा कधी बघितली नाही.
राजाभाऊंनी एका सरदाराला बाजूला घेऊन विचारले," अरे ही अंत्ययात्रा असताना तुम्ही लोक असे का नाचताहात ?"
सरदार म्हणाला," पहिल्यांदाच कुणी सरदार ब्रेन ट्युमरने मेला, आता कोणी म्हणणार नाही सरदारांना ब्रेन नसते." आणी तो परत नाचायला लागला.

बरोबरी !

एकवेळ संगणक मानवाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करेल पण मानवाच्या मुर्खपणाची बरोबरी करता येणार नाही !