मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

November, 2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवास.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात येऊन गेल्यावर आपल्या लालू भैय्यांना आपण पण अमेरिकेला जावे असे वाटू लागले. लालू भैय्यांनी विमानतळावर फोन करुन विचारले," अमेरिकेला जायचे असल्यास किती वेळ लागेल ?"
पलिकडून," एक मिनिट हं."
लालू भैय्या," धन्यवाद."

नजर !

"अरे तुझ्या काकांच्या बोटीला काय झाल ?", किशोर

महेश,"तुला तो समुद्रातला दगड दिसतोय ?"

किशोर,"होय."

महेश,"माझ्या काकांना नाही दिसला.  "

सराव !

गंपुनाना हॉस्पीटलच्या बेडवर पडले होते.

नर्स : नाना, तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय, सुधारण दिसतेय तब्येतीत.

गंपुनाना : होना, सुधारणा होणारच. काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना.