मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

October, 2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दान !

बाबा बाबा त्या गरिब म्हातार्‍या बाईला एक रुपया द्याना.

हे घे, मला तुझा दानी स्वभाव बघुन आनंद झाला. पण कुठे आहे ती म्हातारी बेटा.

ती बघा, तिथे एक रुपयाला कुल्फी विकते आहे !

विसर !

नाना : (किंचाळत) डॉक्टर, मला बघाना काय झालय. मी सगळ विसरतोय.

डॉक्टर : थांबा शांत रहा, तुम्हाला अस कधि पासुन होतय ?

नाना : काय म्हणालात, काय कधि पासुन होतय ?

पोलीस !

बळवंतरावांनी गावाबाहेर जमीन घेऊन एक छान बंगला बांधला व तिथे रहायला गेले. एकदा रात्री बंगल्याच्या आवारात आवाज आल्याने ते उठले व बाहेर बघितल तर काही लोक त्यांच्या आवारात असलेल्या वस्तु नेताना दिसले. बळवंतरावांनी तडक पोलीस स्टेशनला फोन लावला," अहो, माझ्या आवारात चोर शिरलेत आणि ते माझ्या मालकिच्या वस्तु नेताहेत जरा लौकर याल का. "
पलिकडून : "शक्य नाही, इथे कोणिही नाही. आल्यावर लगेच पाठवतो."
बळवंतराव जरा थांबले व परत पोलीस स्टेशनला फोन लावला. मी थोड्यावेळा पुर्वी फोन केला होता माझ्या आवारात चोर शिरलेत हे सांगायला. आपण नाही आलात तरि चालेल, मी माझ्या बंदूकिने त्या सर्वांना ठार केले."

थोड्यावेळातच पोलीस व्हॅन घेऊन आले.
पोलीस : तुम्ही तर म्हणाला होता तुम्ही सर्वांना ठार केले.
बळवंतराव : तुम्ही म्हणाला होता ना तिथे कुणी नाही.