--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: बघुन चाला.

बघुन चाला.

एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्‍या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली.
तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या. दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली.

थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्‍यांना सांगू लागला," बघुन चाला हं. बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल."

४ टिप्पण्या:

  1. आपला ब्लॉग आजच वाचला "पहिल्यांदा".
    आपल्या ब्लॉगवरची "साहित्य चोरीची" सूचना वाचून मला एकदम विचित्रच वाटले. कारण माझाही एक ब्लॉग आहे असाच. त्यावर मी काही विनोद संग्रहीत केले आहेत, वेगवेगळ्या माध्यमांतून उदा: वर्तमानपत्र, मासिके, इ. काही विनोद मी "पुढारी"मधुनही घेतलेत.

    पण आज आपला ब्लॉग वाचत असताना असं लक्षात आलं की त्यापैकी काही विनोद आपल्या ब्लॉगवरील आहेत. त्यामुळे नकळत ती कॉपीच झाली आहे माझ्याकडून म्हणा. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
    आपण हे विनोद स्वत: लिहीत असाल तर तसा उल्लेख आपण करावा आणि मलाही san30390@gmail.com येथे कृपया ई-मेल करावा अशी विनंती.

    आपल्या प्रतिक्रियेची मी वाट पाहत आहे.

    सूचना : आपल्याला ई-मेल करण्यासाठी आपला पत्ता कृपया या ब्लॉगवर लिहावा कुठेतरी.

    उत्तर द्याहटवा
  2. sandy,
    विनोद ह कुठेही कसाही घडत असतो. बरेचदा आपल्या बोलण्यातही काही विनोद घडतात, त्यामुळे विनोदावर तसा कुणाचा मालकी हक्क नसतो.
    माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केलेले विनोद मी कुठेतरी घडलेल्या घटना टिपल्यावर त्यातुन तयार होणार्‍या विनोदातुन लिहीतो. अशा विनोदांची माझ्या ब्लॉगवरिल संख्या बरिच आहे. बरेच विनोद कुणीतरी सांगितल्यावर मी फक्त शब्दात मांडतो.
    मी साहित्य चोरी म्हणतोय कारण मी प्रकाशित केलेले विनोद कुणी जसेच्या तसे व मोठ्ठ्या प्रमाणावर त्याच क्रमाने प्रकाशित करित असेल तर याला आपण काय नाव द्याल ?
    आपण माझ्या ब्लॉग वरिल विनोद कॉपी करुन पुन्हा प्रकाशित करित असाल तर कृपया तो माझ्या ब्लॉगवरुन घेतला आहे हेही सांगावे, तसे करण्यास माझा विरोध असणार नाही. पण आपण जर तसे करित नसाल तर मी याला चोरीच म्हणणार.
    माझा ई-मेल पत्ता कोठेही दिलेला नाही कारण तसे केल्यावर बर्‍याच नको त्या मेलने माझा इनबॉक्स भरुन जातो

    उत्तर द्याहटवा
  3. माफ करा पण हे वाचून वाईट वाटते कि आपल्या ब्लोगवरील विनोद चोरी होत आहेत, एकंदरीत आपण संकुचित मनोवृत्तीचे असल्याचे जाणवते, कारण लोकांना हसवणे हि फार आनंदाची गोष्ट, पण आपण त्यात हात आखडता घेतल्याचे दिसते. कारण आपल्याला आपल्यामुळे कुणीतरी हसत आहे या आनंद पेक्षा, विनोद चोरी जाण्याचे दुख जास्त आहे असे वाटते. तरीही यात जर काही चुकीचे लिहिले असेल तर माफ करावे. पण एकाच सांगेन कुणालातरी हसविण्यासाठी जर चोरी होत असेल तर मी म्हणेन ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण त्या मागे हसविणे हाच एकमेव उद्देश असू शकतो, चोरी करणे नव्हे.

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद शिवराज साहेब,
    आपण माझ्या ब्लॉगवर येऊन आपली प्रतिक्रीया दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे.
    आपल्याला माझे चांगले विनोद न दिसता माझी संकुचित मनोवृत्ती दिसली व आपण ती माझ्या निदर्शनास आणुन दिली याबद्दल मी आपले आभार कसे मानावेत हे कळेनासे झाले आहे.
    मला वाटते आपल्याला मी "चोरी" हा शब्द बोचला असावा. कारण मी हा शब्द ज्यांच्या बद्दल वापरला तो आपला मावस भाऊ असावा.

    असेच येथे येऊन माझे अवगुण दाखवत जावे.

    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...