Olx

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०

आज माझा दूसरा वाढदिवस !

नमस्कार,
आज मला माझा दूसरा वाढदिवस साजरा करताना फार आनंद होतोय,
आपण या दोन वर्षात मला जे प्रेम दिल ते मी कसे विसरणार ?

या दोन वर्षात माझ्या वर प्रेम करणारे असंख्य लोक भेटलेत बर्‍याच जणांनी मला माझ्या प्रगतिसाठी सुचनाही केल्यात, त्या सर्वांचा मी हृदया पासुन ऋणी आहे.

प्रत्येकाचे व्यक्तिश: आभार मानणे मला शक्य नाही, व तसे आपल्यालाही आवडणार नाही याचीही मला कल्पना आहे.

आपले निर्व्याज प्रेम असेच मिळत राहो हिच प्रार्थना.

Olx