मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

February, 2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धिमान सरदार !!!

एकदा एका सरदारजीला सर्व लोक सरदारांवर हसतात याचा खुप राग आला. त्याने भरपुर डोके चालवून लोकांना मुर्ख बनवायचे ठरवले. बर्‍याच काळाने त्याला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या घराजवळ एका मैदानात एक तंबू घातला व जाहिरात केली, इंग्रजी बोलणारी बकरी बघा, तिकीट फक्त दहा रुपये.

पहिल्या दिवशी त्याच म्हणण लोकांनी हसण्यावर नेल.

दुसर्‍या दिवशी तेथे तिकीटा साठी मोठ्ठी रांग लागली.

लोकांनी आत जावून बघितल तर त्यांना एक बकरी एका खांबाला बांधलेली दिसली, पण ती काही इंग्रजी बोलेना.
लोकांनी विचारल्यावर सरदारजी त्या बकरी जवळ गेला व म्हणाला," बेटा, एप्रिल महिन्या नंतर कोणता महिना येतो ?
बकरी ओरडली," मेsssssss."

आज माझा दूसरा वाढदिवस !

नमस्कार,
आज मला माझा दूसरा वाढदिवस साजरा करताना फार आनंद होतोय,
आपण या दोन वर्षात मला जे प्रेम दिल ते मी कसे विसरणार ?

या दोन वर्षात माझ्या वर प्रेम करणारे असंख्य लोक भेटलेत बर्‍याच जणांनी मला माझ्या प्रगतिसाठी सुचनाही केल्यात, त्या सर्वांचा मी हृदया पासुन ऋणी आहे.

प्रत्येकाचे व्यक्तिश: आभार मानणे मला शक्य नाही, व तसे आपल्यालाही आवडणार नाही याचीही मला कल्पना आहे.

आपले निर्व्याज प्रेम असेच मिळत राहो हिच प्रार्थना.

सुंदर बाई !

नवरा घरी आल्यावर....

बायको : अहो,  मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली.


नवरा : मग काय केल तु ?


बायको : काही नाही, थोड्या वेळाने मी आरश्या समोरुन बाजुला झाले.

डॉक्टर सांता.

डॉक्टर सांताने फार गंभीर चेहरा करुन हातात टॉर्च घेऊन पेशंटचे डोळे तपासले, जिभ बघितली, कान तपासले आणी.........
बराच विचार करुन म्हणाला..........
टॉर्च चांगला आहे !!!