मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

November, 2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परिक्षा !

कॉलेजमध्ये आमच्या वर्गात चार अतिशय व्रात्य मुले होती.
चाचणी परिक्षेच्या अगोदर चौघेही रात्री बर्‍याच वेळ खेळत होते. दुसर्‍या दिवशी परिक्षे आधि चौघेही प्राचार्यांकडे फारच खराब झालेले घाणेरडे कपडे घालून गेले व काल रात्री आम्ही एका लग्नाला गेलो होतो व परत येताना आमच्या कारचे टायर फुटल्याने आमची ही अवस्था झाली आहे असे प्राचार्यांना सांगितले.
प्राचार्य म्हणाले बर पण चारच दिवसांनी मी तुमची चौघांची चाचणी घेणार. असे ऎकून मुले फार खुष झाली.
चौथ्या दिवशी चौघेही परिक्षेला गेले.
प्राचार्य त्यांना म्हणाले ही परिक्षा मी काही परिस्थीती मुळे पूढे धकलली आता तुम्ही तयारी करुन आला असाल तर मी परिक्षा घ्यायला तयार आहे. पण चौघांनाही वेगवेगळ्या खोलीत बसवणार व फक्त दोनच प्रश्न विचारणार.
दोनच प्रश्न ऎकून मुलांना आनंद झाला.
मुलांना चार खोल्यात बसवण्यात आले व प्रश्नपत्रिका देण्यात आली.
त्यातील प्रश्न होते.

प्रश्न १ तुमचे नाव काय आहे ? (०४ गुण)
प्रश्न २ तुमच्या कारचा कोणता टायर फुटला होता ? (९६ गुण)
अ. समोरचा डावा.
ब. समोरचा उजवा.
क. मागचा डावा.
ड. मागचा उजवा.

सुनिताबाईंचे निधन.

आपले आवडते लेखक स्व. पु. ल. देशपांडॆ यांच्या पत्नि सुनिताबाई देशपांडे याचे पुणे येथे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.