--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: जानेवारी 2009

झोपेत उपसंपादक !

श्री. म्हात्रे यांनी आपल्या स्पर्धकांसह शिवसेनेत प्रवेश केला तर शिवसेनेतच (राजकिय हाणामारीच्या) स्पर्धा होणार आहेत कां ?
पुंडलिक म्हात्रे यांचा आज शिवसेना-प्रवेशकल्याण, २८ जानेवारी/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी महापौर पुंडलिक म्हात्रे हे उद्या आपल्या स्पर्धकांसह मातोश्री येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून म्हात्रे हे शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सेनेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक व पदाधिकारी म्हात्रे यांच्यासमवेत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कर्ज !

एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतल.
ते कर्ज तो फेडू न शकल्याने बॅंकेचे अधिकारी ती कार घेऊन गेले.
यावर तो माणूस म्हणाला,"मला माहीत नव्हत, नाही तर मी लग्नासाठी पण कर्ज घेतल असतं."

श्रेय !

मुलाकातकार : तुम्ही कोट्याधिश झालात या यशाच श्रेय कोणाला द्याल ?
कोट्याधिश : मी माझ्या सर्वच बाबतीतल श्रेय माझ्या पत्निला देतो. मी आज जे काही आहे ते तिच्या मुळेच.
मुलाकातकार : तर तुमची बायको फारच कर्तुत्ववान आहे. तुम्ही लग्नापुर्वी काय होता ?
कोट्याधिश : अब्जाधिश.

संकट.

ती : ऑफिसला जाताना तुम्ही माझा फोटो आपल्या पाकिटात का ठेवता ?
तो : अग त्यामुळे माझी संकटं लगेच सुटतात.
ती : कस कायं ?
तो : अगं, कोणतही संकट आलं किंवा कठिण काम आल की मी पाकिटातुन तुझा फोटो काढुन त्याकडे बघतो, त्यामुळे तुझ्यापुढे कोणतेही संकट हल्क वाटयला लागते !!!

पर्याय.

एकदा एका खिसेकापूला कोर्टात हजर करण्यात आले.
न्यायाधीशांनी त्याला सहा महिने जेल किंवा दोन हजार रुपये दंड ठोठावला. तेंव्हा खिसेकापू चोराचा वकिल म्हणाला, "साहेब, माझ्या अशिलाला दंड भरायचा आहे, पण त्याच्याकडे फक्त एक हजार रुपयेच आहेत. तुमची परवानगी असेल तर तो या गर्दीत दहा मिनीटे फिरुन अजुन एक हजार रुपये आणु शकेल."

देणगी !!!

सांताचा मुलगा : बाबा, आपल्याकडे कोणीतरी स्विमींग पुल साठी देणगी मागायला आला आहे.
सांता : देउन दे त्याला एक तांब्या पाणी.

देवाची सुधारणा.

बाळ : आजोबा, तुम्हाला कोणी बनवल ?
आजोबा : बाळा देवाने.
बाळ : कधी ?
आजोबा : बरेच वर्षे झालीत.
बाळ : आणि मला कोणी बनवल ?
आजोबा : तुला पण देवानेच बनवल, तीन वर्षांपुर्वी.
बाळ दोघांचेही चेहरे बघत : इतक्या वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना ?

घटस्फोट.

साहेब माझी बायको गेले सहा महिने माझ्याशी बोलतच नाहीये. मला तिच्यापासुन घटस्फोट मिळवून द्या. मी तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला तयार आहे.
वकिल: काय तुम्ही नशिबवान, अहो अशी बायको मिळत नाही. घटस्फोट घेऊ नका.

चोर.

एकदा सांताच्या घरात रात्री एक चोर शिरला. सांता समोर आल्यावर सांताला म्हणाला," सोना कहां है."
सांता," ,अरे पुरा घर खाली है जहा चाहे वहा सोजा."

सोपा मार्ग.

दोन भिकार्‍याचा संवाद
पहिला भिकारी : अरे , मी एक पुस्तक लिहिल आहे.
दुसरा : काय नाव आहे त्याच ?
पहिला : सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग.
दुसरा : तर तु भिक का मागतोस ?
पहिला : तो सर्वात सोपा मार्ग आहे.

तेज !!!

सुनिताला शाळेत नोकरी लागली.
तिने शाळेत कामावर रुजू होण्यापुर्वी एक गॉगल विकत घेतला.
का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तिने ऎकल होत त्या शाळेत बरेच तेजस्वी मुल आहेत !!!

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...