Olx

शुक्रवार, ५ डिसेंबर, २००८

सरकार.

काय हो, महाराष्ट्रात सरकार बघितलं कां ?
असे म्हणतात परवा पर्यंत होत, त्यानंतर वादळात उडून गेल.
आज सापडलं माताजींच्या चरणी.
माताजी आता छुमंतर करणार आणि महाराष्ट्रात सरकार परत येणार.
माताजी लय पॉवरबाज आहे म्हणतात.
पॉवरबाज म्हणजे लय पॉवरबाज. त्या पवारला पण पुरून उरल्या.
अस कसं ?
म्हणूनतं त्यांना इंपोर्ट केलंना.
इंपोर्टेडचा शिक्का लागला की भारतात कायबी खपते.

हल्ली पाकिस्तानातुन पण लोकांना इंपोर्ट करतात, काही लोकांना भारताच्या वाढत्या लोकसंख्येवर उपाय
हवा होता. आपले मंत्री जसे कोणत्याही प्रश्नावर परदेशात अभ्यास दौरा करतात तसे ते पण या प्रश्नावर उपाय काढायला दुबईला गेले होते. तेंव्हा त्यांना ते तंत्रज्ञान पाकिस्तान कडे आहे असे कळले.
तेंव्हा पासुन माणसे देवाकडे एक्स्पोर्ट करायला पाकिस्तानी तंत्रज्ञान वापरतात.

तर आपण सरकार बद्दल बोलत होतो. आपल सरकार आता माताजींच्या चरणी आशिर्वादासाठी गेले आहे.
त्यामुळे माणसे देवाकडे एक्स्पोर्ट करणारी आणखी एखादी पाकिस्तानी टीम भारतात आली तर सरकार नसल्याने काय घडेल याचा विचार करायची जबाबदारी आपल्यावर आहे.
तर सांभाळुन रहा................... नाहीतर एक्स्पोर्ट केलं जाईल............. वाचवायला सरकार नाही म्हटलं.

Olx