मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

December, 2008 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्महत्या.

बांता : सांता, तु हा चाकू उकळत्या पाण्यात का ठेवलाय ?
सांता : मला या चाकूने आत्महत्या करायची आहे.
बांता : तर उकळायची काय गरज आहे ?
सांता : आत्महत्या करताना कोणतेही इन्फेक्शन नको व्हायला ना.

गच्छंती.

मि. देसाई तुम्हाला नोकरिवरुन काढलं जातय. बॉस देसाईला म्हणाला.
पण सर. -देसाई
बॉस : पण काय ?.
देसाई : पण सर, मी काहिही केल नाही.
बॉस : होय खरयं. तुम्हाला काम करण्यासाठी कामावर ठेवलय. त्यामुळे, काहिही काम न करण्यामुळे तुम्हाला कामावरुन काढण्यात आलय !

बदक.

एकदा एका प्राथमिक शाळेत चित्रकलेचा तास होता.
शिक्षीकेने मुलांना छत्री धरलेल्या बदकाचे चित्र रंगवायला दिले.
मुलांना सांगितल की बदकाला पिवळा रंग द्या व त्याच्या छत्रिला निळा रंग द्या.
छोट्या संजयने मात्र बदकाला हिरवा रंग दिला व त्याच्या छत्रिला लाल.
शिक्षीकेने त्याला विचारले अरे तु हिरवा बदक किती वेळा बघितलाय ?
त्यावर छोटा संजय म्हणाला बाई छत्री धरलेला बदक बघितला तितक्याच वेळा.

क्रिकेट.

सांता क्रिकेट खेळायला गेला.
एका स्पर्धेत त्याच्या ३५ धावा झाल्यावर त्याने आपली बॅट उंचावून प्रेक्षकांना नमस्कार केला. त्याच्या या कृतिने सर्वच अवाक झाले.
त्याचा सोबती म्हणाला अरे तुझ्या पन्नास किंवा शंभर धावा झाल्यावर असे करायचे ३५ धावांवर नाही.
यावर सांता म्हणाला," तुला ३५चा महिमा माहित नाही काय ?"
सोबती : नाही.
सांता : मला तर शाळेत असल्या पासुन माहित आहे.
सोबती : तो काय ?
सांता : अरे ३५ गुण मिळाल्यावर आपण पास होतो ना.

गणित.

गुरुजी : बाळू सांग, तुझ्या बाबांकडे १० रुपये आहेत, तु त्यातले ५ रुपये मागितले, तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक रहातील ?
बाळू : सर, १० रुपये.
गुरुजी : तुझ गणित फार कच्च आहे का रे ?
बाळू : नाही सर, तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही.

जेवण.

बबन : अरे काय हे वाढलय ? मी अस वाईट अन्न खाऊ शकत नाही. बोलाव तुझ्या मॅनेजरला.
वेटर : नाही साहेब, तेही हे अन्न खाऊ शकणार नाहीत.

आजोबांची शिंक !

नातू : आजोबा तुम्ही कित्ती जोरात शिंकता. पण तुम्ही तोंडावर हात ठेवणे शिकलात हे बघून छान वाटले.
आजोबा : काय करु बेटा. तोंडावर हात ठेवला नाही तर माझी कवळी तोंडातुन बाहेर पडते ना !!!

भाडं !

रिक्षावाला मिटरकडे बघुन : साहेब १०० रुपये झालेत.
सांता : हे घे ५० रुपये.
रिक्षावाला : साहेब हे बरोबर नाही. १०० रुपये झाले असतांना तुम्ही मला ५० रुपयेच देत आहात.
सांता : अरे तु पण माझ्या सोबत रिक्षात बसुन आलास नां ?

विमा.

विमा पॉलिसी घेण्यासाठी बरेच फोन आल्यावर सुरेखाबाईंनी एका एजंटला घरी बोलावले. कोणती पॉलिसी चांगली यावर बरिच चर्चा झाल्यावर सुरेखाबाई एजंटला म्हणाल्या समजा आज मी ह्यांची पॉलिसी घेतली आणि उद्या त्यांचे निधन झाले तर मला काय मिळेल ? "आजिवन कारावास.", विमा एजंट उत्तरला.

कार बनवणारे वेडे !

सांतासिंग अमॄतसरहून जलंधरला आपल्या मारुती कारने जातो. आईला दोन तासातच पोहचल्याचा फोन करतो व आपल्या कामासाठी जातो.
काम झाल्यावर आईला परत फोन करुन सांगतो मी संध्याकाळ पर्यंत परत येतोय.
रात्र झाली तरी सांता घरी पोहचत नाही.
दुसर्‍या दिवशीही पोहचत नाही.
तिसर्‍या दिवशी दमलेला सांता घरी पोहचल्यावर त्याची आई विचारते," बेटा काय झाल ? तु तर दोन तासातच पोहचला होतास. परत यायला इतका वेळ का लागला ?"
सांता : अग आई हे कार बनवणारे वेडेच आहेत. समोर जायला कारला चार गिअर दिलेत तर मागे जायला फक्त एकच गिअर दिलाय त्यांनी.

कारण.

पहिला : मला स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचा, घर झाडायचा कंटाळा आला म्हणुन मी लग्न केलं.
दुसरा : मला याच गोष्टींचा कंटाळा आला म्हणुन मी घटस्फोट दिला.

पहिले पाऊल !

धनंजय : अरे संजय आज मी घटस्फोटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
संजय : का ? कोणी चांगला वकिल भेटला का ?
धनंजय : नाही, आज माझे लग्न ठरले.

पांढरे कपडे !

नवरा : अग बघ मी माझ्या हातानेच आज कपडे धुतलेत.
बायको : हो का ?
नवरा : बघ ना कसे छान स्वच्छ पांढरे झालेत.
बायको : हो ना तुमचा आवडीचा तो लाल शर्ट पण स्वच्छ पांढरा झालाय.

सोनिया गांधी : भारतीयांनो डोळे उघडा.

एका फ्रेंच लेखकाचे सोनिया गांधी बद्दलचे मत.
समस्त कॉंग्रेसी व भारतीय आता तरी जागे होतील हि अपेक्षा.
मूळ लेख वाचण्यासाठी कॄपया या वाख्यावर टिचकी द्या.

सरकार.

काय हो, महाराष्ट्रात सरकार बघितलं कां ?
असे म्हणतात परवा पर्यंत होत, त्यानंतर वादळात उडून गेल.
आज सापडलं माताजींच्या चरणी.
माताजी आता छुमंतर करणार आणि महाराष्ट्रात सरकार परत येणार.
माताजी लय पॉवरबाज आहे म्हणतात.
पॉवरबाज म्हणजे लय पॉवरबाज. त्या पवारला पण पुरून उरल्या.
अस कसं ?
म्हणूनतं त्यांना इंपोर्ट केलंना.
इंपोर्टेडचा शिक्का लागला की भारतात कायबी खपते.

हल्ली पाकिस्तानातुन पण लोकांना इंपोर्ट करतात, काही लोकांना भारताच्या वाढत्या लोकसंख्येवर उपाय
हवा होता. आपले मंत्री जसे कोणत्याही प्रश्नावर परदेशात अभ्यास दौरा करतात तसे ते पण या प्रश्नावर उपाय काढायला दुबईला गेले होते. तेंव्हा त्यांना ते तंत्रज्ञान पाकिस्तान कडे आहे असे कळले.
तेंव्हा पासुन माणसे देवाकडे एक्स्पोर्ट करायला पाकिस्तानी तंत्रज्ञान वापरतात.

तर आपण सरकार बद्दल बोलत होतो. आपल सरकार आता माताजींच्या चरणी आशिर्वादासाठी गेले आहे.
त्यामुळे माणसे देवाकडे एक्स्पोर्ट करणारी आणखी एखादी पाकिस्तानी टीम भारतात आली तर सरकार नसल्याने काय घडेल याचा विचार करायची जबाबदारी आपल्यावर आहे.
तर सांभाळुन रहा................... नाहीतर एक्स्पोर्ट केलं जाईल......…

Pakistani Website Hacked.

भारतीय संगणक तज्ञांनी http://pimsat-khi.edu.pk/ ही वेबसाईट हॅक केली आहे.
सर्व संगणक तज्ञांचे अभिनंदन.
पाकिस्तान भारतासोबतचे कोणतेही युद्ध हरणार, त्यामुळे अतिरेकी पाठवण्याचे काम पाकिस्तान करतोय.
वंदे मातरम. जय हिंद.

बायकोचा शोध.

पराग आपल्या मित्राला सांगत होता," अरे, मी ज्या-ज्या मुलीला लग्नासाठी पसंत करतो ती मुलगी आईला आवडत नाही. काय करू कळत नाही." मित्र : तु तुझ्यासाठी तुझ्या आईसारखीच एखादी मुलगी बघ. ती तुझ्या आईला आवडेल. पराग काही दिवसांनी : अरे मी अगदी आईसारखीच मुलगी शोधली पण बाबा माझा व तिचापण राग करायला लागलॆ.