--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: ऑक्टोबर 2008

घटस्फोटाचे कारण ?

न्यायाधिश: सांता तर तुला घटस्फोट हवाय ?
सांता : होय साहेब.
न्यायाधिश : तुझ्यामते घटस्फोटाचे मुख्य कारण काय आहे ?
सांता : साहेब, लग्न.

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

हि दिवाळी आपण सर्वांना

मंगलमय

आनंददायी

सुख

समॄद्धी

भरभराटीची

जावॊ हिच ईश्वर चरणी प्रार्थना.





हार !

ऑपरेशन आधि रुग्णाला सर्व तयारी सोबत टेबलवर एक हारही दिसतो.
त्यामुळे तो काहिसा उत्सुक होऊन डॉक्टरला विचारतो, " डॉक्टर, बाकी तयारी मी समजू शकतो पण हा हार कशासाठी ?"
डॉक्टर : हे बघा हे माझं पहिलच ऑपरेशन आहे. समजा ते यशस्वी झालं तर हा हार माझ्यासाठी नाही झाल तर तो............. तुमच्यासाठी."

नेता !

नेता (व्याख्या): असा माणुस जो निवडणुकीपुर्वी तुम्हाला शोधत असतो व निवडणुकीनंतर तुम्ही त्याला.

तिसर विश्व युध्द !

शिक्षक : मुलांनो तिसर विश्वयुद्ध झाल तर काय होईल ?
बाळू : सर फार गंभीर परिणाम होतील.
शिक्षक : सांग काय परिणाम होतील ?
बाळू : सर ईतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.

प्रगती ?

तंत्रज्ञानाची प्रगती
वडिलांचा मुलाला ई-मेल.
बेटा तु कसा आहेस ?
मी व तुझी आई छान आहोत. आम्हाला तुझी फार आठवण येते.
चल तुझा कॉम्प्युटर बंद कर आणि जेवायला ये !

अनुभव.

नन्या : अरे बन्या माझा बॉस रोज रोज मला त्याच्या घरापर्यंत माझ्या स्कूटरवर लिफ्ट मागतो रे. मला कंटाळा आला आहे याचा. काय करु सांगना.

बन्या : तो गाडीवर बसुन काही बोलतो का ?

नन्या : हो , माझ्या चालवण्याच कौतुक करत असतो.

बन्या : त्याने कौतुक केल्यावर त्याला सांग तु रस्ता पार करताना काय करतोस. तो परत लिफ्ट मागणार नाही.

नन्या : काय सांगु ?

बन्या : त्याला सांग रस्ता पार करतांना तु डोळे बंद केलेले असतात व लोकांनी ते बघितले असते म्हणुन अपघात होत नाही. यात तुझे कौशल्य नाही.

.

.

.

.

काही दिवसांनी.

नन्या : अरे बन्या तुझा मंत्र कामी आला.

त्रस्त !

एकदा स्वर्गाच्या दारात प्रवेश घेणार्‍यांची रांग लागली होती.
बायकांना अर्थातच स्वर्गात सरळ प्रवेश होता व पुरुषांना रांगेत उभे राहुन परिक्षा दिल्यावर प्रवेश मिळायचा.
पुरुषांची रांग दोन प्रकारची होती.
एका रांगेत असे पुरुष होते जे जिवंतपणी त्यांच्या बायकोच्या धाकात होते तर दुसर्‍या रांगेत जे आपल्या बायकोच्या धाकात नव्हते.
धाकात असणार्‍यांची संख्या प्रचंड होती तर धाकात नसणार्‍या लोकांच्या रांगेत फक्त एकच माणूस ऊभा होता.
सर्व जण त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते व त्याच कौतुकही करत होते.
शेवटी एकाने त्याला त्याच्या हिमतीच कौतुक करत यातील गुपीत विचारले.
तेंव्हा तो म्हणाला, " अरे गुपीत काही नाही, माझ्या बायकोने सांगीतल म्हणुन मी येथे उभा आहे."

विस्मरण.

एके दिवशी मी डॉक्टरांकडे गेलो.
डॉक्टरांनी मला विचारले काय होतेय. मी सांगीतले हल्ली मला फार विसरायला होतेय.
तर.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टरांनी मला तपासण्यापूर्वीच त्यांचे बिल दिले !!!

अटक.

एका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक.
"येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल."

हस्ताक्षर.

कारकून : साहेब हे काय लिहिलय मला वाचताच येत नाही.
साहेब : बघु, अरे हे हस्ताक्षर तर कोणीही गाढव वाचू शकतो. आण ते माझ्याकडे मीच वाचून दाखवतो.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...