--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: सप्टेंबर 2008
आई, आज भारत महागाई, अतिरेक्यांचे निष्पाप लोकांवर हल्ले, भ्रष्टाचार, राजकारण्यांनी घातलेला गोंधळ इ. प्रश्नांनी ग्रस्त आहे.
तुझे भक्तगण या सर्व प्रश्नांना तोंड देता-देता हतबल झालेत.
तुझ्या समस्त भक्तांना या सर्व प्रश्नांशी झगडायचे सामर्थ्य तुच देऊ शकतेस.
सर्व वाचकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा.


विमा.

विमा: एका कंपनी सोबतचा करार ज्यामुळे तुम्ही जन्मभर गरीब रहाता व तुम्ही मेल्यावर तुमचे घरचे लोक श्रीमंत होतात.

जागतिक हॄदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हसण्याने मन प्रसन्न रहाते,
मन प्रसन्न राहिले की हॄदयावरचा ताण कमी होतो,
हॄदयावरचा ताण कमी राहिल्यास तब्येत चांगली रहते,
तब्येत चांगली राहिल्यास माणुस चांगला रहातो,
माणुस चांगला राहिल्यास समाज चांगला रहातो,
समाज चांगला राहिल्यास राष्ट्र चांगले रहाते, बलवान होते.
आपल्या राष्ट्राला बलवान करण्यास आपले मन प्रसन्न ठेवा, हॄदय चांगले ठेवा !
जागतिक हॄदय दिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा !

नेपोलियन कुठला.

सांता: अरे मला वाटते की नेपोलियन रशियाचा असावा.
बांता: कां ? तुला असे का वाटते ?
सांता: अरे आजच्या पेपर मध्ये मी तो रशियाचा होता असे लिहीले !

भैय्या.

एक भैय्या, एक मद्रासी आणि एक मराठी एकदा आसामच्या जंगलात जातात.
तिथल्या आदिवासींना बघितल्यावर तिघेही घाबरतात. पण ते आदिवासी त्यांना बघुन त्यांना आनंद झाला आहे असे चिंन्हांनी दाखवतात.
त्यांचे स्वागत करायला तिघांना एका ओट्यावर उभे केले जाते व सांगतात कि त्यांच्याकडे पाहूण्याचे स्वागत पाहूण्यांची पाठ दाबून केले जाते.
पहिल्यांदा भैयाला बोलावले जाते. भैया सांगतो की त्याच्या पाठीला तेल लावून दाबण्यात यावं. एक आदिवासी भैयाच्या पाठीला तेल लावतो व दूसरा त्याची पाठ एक मोठ्या बांबूने फटके मारून दाबतो. भैया कण्हत एका बाजूला बसतो.
मद्रास्याला विचारले जाते कि पाठीला काय लावयचे.
तो म्हणतो काही नको. त्याला तसेच फटके पडतात.
मराठी माणसाला विचारल्यावर तो सांगतो,"माझ्या पाठीवर भैया लावून त्यानंतर फटके मारा !"

बॉस.

बॉस : एक व्यक्ति, ऑफिस मध्ये तुम्हाला उशिर झाला असतांना लौकर येते व तुम्ही लौकर पोहचले असतां उशिरा येते

शेअर बाजार !!!

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्‍यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्‍यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्‍यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्‍यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्‍यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केलेत कारण गावकर्‍यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्‍यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्‍यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्‍यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्‍यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागलेत.
असा चालतो शेअर बाजार !!!

सांताची नोकरी.

सांताला एका पॅकिंग कंपनीत नोकरी लागली.
सांताने लौकरच एक चांगला कर्मचारी म्हणुन नाव कमावलं. त्यामुळे सांता व त्याचे वरिष्ठ अधिकारी फार खूष होते.
एकदा एक कर्मचारी ज्याच्याकडे ड्ब्यांवर वरची बाजू लक्षात येण्या साठी "This side UP" चा शिक्का लावायचे काम होते तो रजेवर होता, त्यामुळे सांताला ते काम देण्यात आले.
सांता फार मन लावून काम करित होता. पण बराच वेळ लागल्यामुळे त्याचा बॉस बघायला गेला.
सांताला त्याने वेळ लागल्याबद्दल विचारले.
सांता म्हणाल," सर, मी डब्याच्या वरच्याच नाही तर खालच्या बाजूला पण तो शिक्का लावला आहे त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही."

दरवाजा आणि किल्ली.

एकदा एका मनोरुग्णालयात डॉक्टर आठ रुग्णांची परिक्षा घेणार होते. ज्यामुळे त्यांना तेथुन सुटका होणार होती.
डॉक्टरांनी त्या खोलीच्या एका भिंतीवर खडूने दरवाजा काढला व त्या आठ जणांना सांगितले ते दार उघडा व खोलीच्या बाहेर पडा.
सात जणांनी उठुन त्या दाराने बाहेर जायचा खुप प्रयत्न केला पण एक जण आपल्या जागेवरच बसुन राहिला.
डॉक्टरांनी त्याला न उठण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, " मी त्या दाराच्या कुलूपाची किल्ली घेउन बसलो आहे."

धमकी !

सांता पोलीसला फोनवर : हॅलो, पोलीस स्टेशन.
हं बोला काय झाले ?
सांता : मला फोनवर धमक्या येताहेत.
कोण धमक्या देताहेत ? कोण आहेत ते ?
सांता : मला टेलिफोनवाले धमकी देताहेत.
काय ?
सांता : मला म्हणताहेत की, "बिल नही भरा तो काट देंगे.

पोपट आणि ड्रायव्हर !

एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.

त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.

तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्‍यात ठेवतो.

ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्‍यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो," अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."



प्रेषक: मुकूंद मोरे.

राजा - राणी.

एकदा राजा आणि राणीत ठरते की यापुढे मोबाईलने नाही तर कबुतरामार्फतच संदेश पाठवायचा.
तर एके दिवशी राणी कबुतराच्या पायाला चिठ्ठी न लावताच कबुतर उडवते.
ते कबुतर राजाकडे जाते.
कबुतराकडे काही नाही हे पाहून राजा चिडतो आणि राणीला तडक फोन लावतो आणि विचारतो हे काय ?
:
:
:
:
:
:
राणी म्हणते," हा मिस्सड कॉल होता !"

प्रेषक : श्री. मुकूंद मोरे.

पार्किंग : फक्त दोन चाकी वाहनांसाठी.

सरदार सांता आपल्या रिक्षाचे एक चाक काढत होता.

ते पहाणार्‍या एकाने त्याला विचारले सांता असं कां करतोय.

सांता त्याला रागावून म्हणाला : दिसत नाही कां ? येथे पार्किंग फक्त दोन चाकी वाहनांसाठी आहे.

नळाला मासे !

एक वेडा नळाचे पाणी ओंजळीने घेउन बादलीत टाकत असतो. तर एक डॉक्टर त्याला विचारतो काय रे काय करतोस ?
वेडा : दिसत नाही का मी मासे पकडतोय.
काही वेळाने तो डॉक्टर त्याला पुन्हा विचारतो : काय रे किती मासे पकडलेत ?
वेडा : काय वेडा डॉक्टर आहे राव नळाला कधी मासे येतात कां ?

(ई-मेलने पाठविणार्‍याचे नाव कळवलेले नाही)

कोट !

नयन घरी आल्यावर बघतो की त्याची बायको नयना गणपतीच्या तयारी साठी घराला रंग देत आहे व तिने दोन कोट घातले आहेत.
नयन तिला विचारतो कि तिने अस का केलं.
नयना : मी रंग देण्यापूर्वी रंगाच्या डब्यावरिल सुचना काळजी पूर्वक वाचल्या आहेत. डब्यावर लिहील आहे चांगल्या ईफेक्ट साठी दोन कोट घाला.

ताण.

मदन थकुन घरी आला. सोफ्यावर बॅग फेकली आणि तिथेच आडवा झाला.
मनिषा त्याच्यासाठी पाणी घेऊन गेली. बघते तर काय मदन घोरायला पण लागला होता.
"अहो, काय झालं ?"
"अहो, काय झालं तुम्हाला"
मदन : अSSS..., काही नाही गं. आज ऑफिस मधले सगळे कॉंप्युटर बंद पडल्यामूळे आम्हाला डोकं चालवायला लागलं, त्यामुळे थकून गेलो.

गणपती बाप्पा मोरया.

गणपती बाप्पा मोरया
पॄथ्वीवरील वाढत्या प्रदूषण, भ्रष्टाचार, महागाई इ. समस्यांवर लौकरच तोडगा निघावा
यासाठी
गजानना चरणी प्रार्थना.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...