--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: जुलै 2008

वजन !

प्रविण वजन काट्यावर उभा होता.

पोटाचा घेर फार वाढल्यामुळे त्याला वजन दिसत नव्हते. म्हणुन तो पोट आत घेउन वजन पहायचा प्रयत्न करत होता. त्याची हि कसरत पाहून त्याची बायको म्हणाली," प्रविण अशाने तुझं वजन कमी होणार नाही !"

प्रविण म्हणाला," काय करू, या शिवाय मला वजन किती ते दिसतच नाही !"

दोन गाढव !

लग्नाला जाताना नवरदेवाला गाढवावर न बसवता घोड्यावर बसवूनच का नेले जाते ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण दोन गाढव बघून लोक घाबरायला नकोत !
.

बंगळूर, अहमदाबाद........ ?

बंगळूर, अहमदाबाद येथे दहशतवादाचे बळी ठरलेल्या सर्वांना श्रद्धांजली.
अशा घटना पुन्हा घडू नये हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

भांडण !

एका सोसायटीत एकदा सर्व बायकांची एक स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
स्पर्धेत काहितरी कारणाने वाद सुरु झाला.
नेहमीप्रमाणे काही गट तयार झाले व प्रकरण फार ताणल्या गेल.
कुणी माघार घेईना त्यामुळे भांडण कोर्टात गेलं.
कोर्टातही बायकांनी बोलण्यासाठी वादावादी सुरु केली. जजही वैतागले.
काही वेळाने जज साहेबांनी एक तोडगा काढला.
" जी बाई वयाने सर्वात मोठी असेल ती पहिल्यांदा आपली बाजू मांडेल. "
आणि खटला एकमताने मागे घेण्यात आला.

वाईट !

बायको : अहो, खर सांगा ना.
नवरा : काय ?
बायको : तुम्हाला कधि असं वाटलं कां, जर माझ लग्न दुसर्‍या कुणाशी झालं असत तर.........
नवरा : नाही, मी कुणा बद्दल असा वाईट विचार करत नसतो.

बचाव !

न्यायाधिश : तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही तुमच्या बायको व मुलांना सोडुन पळुन गेलात. आपल्या बचावात काही सांगायचे आहे कां ?
आरोपी : न्यायाधिश महाराज, काही सांगायचे असते तर पळून कां गेलो असतो ?

तब्येत !

आजीबाई : हे लिलावती हॉस्पिटल आहे कां ?
रिसेप्शन : हो.
आजीबाई : मला आपल्याकडे रुम नं २०७ मध्ये असलेल्या वत्सलाबाईंबद्दल माहिती मिळेल कां ?
रिसेप्शन : हो, आपल्याला काय माहिती हवीय ?
आजीबाई : त्यांना हॉस्पिटल मधून सुट्टी कधी मिळणार आहे व त्यांचे कालचे रिपोर्ट काय आलेत ?
रिसेप्शन : थांबा मी बघुन सांगते.
हं त्यांचे कालचे रिपोर्ट नॉर्मल आहेत व त्यांना उद्या सुट्टी मिळेल. पण आपण कोण बोलताय ? आपण त्यांच्या नात्यात आहात कां ?
आजीबाई : मी २०७ मधुन वत्सलाच बोलते आहे. मला कोणी माहिती देत नव्हते म्हणुन हा फोन केला !

बेड रेस्ट !

बायको : अहो, आज मी डॉक्टरकडे गेले होते.
नवरा : काय म्हणाले डॉक्टर ?
बायको: म्हणाले, एक महिना तरी बेड रेस्ट घ्यावी लागणार कुठे तरी बाहेर थंडहवेच्या ठिकाणी जाऊन. कुठे जायच आपण ?
नवरा: दुसर्‍या डॉक्टरकडे !

चुक !

पेशंट : डॉक्टर तुम्ही कधि चुक केली आहे कां ?
डॉक्टर : हो केलीय.
पेशंट : काय होती ती चुक ?
डॉक्टर : मी एका खुप श्रीमंत पेशंटला तीनच भेटींमध्ये बर केल होत !

माकड !

वर्गात शिक्षक भुगोल शिकवत असतात.
अफ्रिका व अफ्रिकेतील माकड हा विषय असतो. सरांच्या लक्षात येते कि मंदारच लक्ष वर्गात नाही.
तेंव्हा ते म्हणतात , " अरे मंदार तुझे लक्ष कुठे आहे ? लक्ष माझ्याचकडे ठेव नाहीतर तुला कळणारच नाही माकड कसे असते. "

रजा.

गेले पाच महिने नियमीतपणे "सर्वोत्तम मराठी विनोद" च्या माध्यमातुन आपली भेट होत आहे. वाचकांच्या प्रतिसादामुळे मी खरच भारावून गेलोय. पाच महिन्यांत सुमारे २२००० भेटी या आपल्या ब्लॉगला मिळाल्या.
काही कारणांमुळे चार दिवस रजा घ्यावी लागत आहे.
परत आपल्या सेवेत दिनांक १८ जुलै रोजी रुजू होईन.
परत भेटूया गुरुपौर्णिमेच्या दिवशी.
-दिनेश.

अनुभव !

सांता : जेंव्हा मी धंदा सुरु केला तेंव्हा माझ्याकडे पैसा होता व माझ्या पार्टनरकडे अनुभव.
बांता : तर तुमचा धंदा फार छान चालला असेल ?
सांता : हो ना, शेवटी माझ्याकडे अनुभव आला व माझ्या पार्टनरकडे पैसा.

कॉंग्रेस !

इंग्रजीत PRO च्या विरुद्ध CON आहे.
PROGRESS म्हणजे प्रगती.
यातील PRO च्या जागी CON ठेवा.
आपल्या लक्षात येईल CONGRESS म्हणजे काय !
विचार करा !!!

प्रवेश परिक्षा.

सांता प्रवेशद्वारा जवळ बसुन परिक्षा द्यायला परवानगी का मागत होता ?
.
.
.
.
.
.
डोकं खाजवा.
.
.
.
.
.
.
.
.
कारण ती प्रवेश परिक्षा होती !

वॉंटेड !

सांता दादर स्टेशनवर पोलिसांना हव्या असलेल्या गुन्हेगाराचा फोटो बर्‍याचवेळापासुन निरखून बघत होता.
जवळच्याच एका पोलिसाला संशय आला कि हा त्या अट्टल गुन्हेगाराला ओळखत असेल, म्हणुन तो पोलिस सांताजवळ जावून विचारतो की सांता ईतकावेळ त्या फोटोकडे कां बघत आहे.
सांता पोलिसाला : मी इतक्यावेळचा विचार करतो आहे कि तुम्ही फोटो काढतांनाच त्याला का पकडले नाही.

ऑफिस !

एक भिकारी : साहेब, एक रुपया द्याना फार भूक लागली आहे.
माणूस : तुला लाज वाटत नाही कां ? असं रस्त्यावर भिक मागतांना.
भिकारी : साहेब तुमच्या एक रुपया साठी काय मी ऑफिस थाटू कां ?

उद्या चालेल !

दोन सरदार एकदा बॅंक लूटायला जातात. बॅंकेत गेल्यावर त्यांच्या लक्षात येते ते बंदुक आणायला विसरलेत.
ते तरिही बॅंक मॅनेजरला धमकावतात.
त्यांच्या नशिबाने बॅंक मॅनेजरही सरदारच असतो. तो त्यांना सांगतो की बॅंक आज लुटा व बंदुक उद्या दाखवायला आणा.

कटू सत्य !

पेप्सीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याला आपल्या नोकरीला मुकावे लागले. कारण तो कोका-कोला पिताना रंगेहाथ पकडला गेला !!!
कोका-कोला पित असतांना तो म्हणाला मला पेप्सिपेक्षा कोकच आवडतं.

बुध्धिमान सांता !

सांता : ए, बांता चल यार फार कंटाळा आलाय कुठेतरी बाहेर जाऊया.
बांता : नाही यार बाहेर पावसात फिरायला मला नाही आवडत.
सांता : तर काय करयचं ?
बांता : चल पत्ते खेळूया .
सांता : नको मला तेही नाही आवडत.
बांता : तर काय करायच तुच सांग. चल चेस खेळूया.
सांता : बरं, पण थांब मी स्पोर्ट शूज घालून येतो.

ईमान !

बाळूला आपला कुत्रा विकायचा होता. कुत्रा बघायला एक माणुस त्याच्याकडे येतो. तो बाळूला विचारतो, " सगळे ठीक आहे पण तुमचा कुत्रा प्रामाणिक आहेना ?"
बाळू : हो, माझा कुत्रा अतिशय प्रामाणिक आहे.
ग्राहक : त्याच्या प्रामाणिकपणाचं एखाद उदाहरण आहे का तुमच्याकडे ?
बाळू : अहो मी त्याला आतापर्यंत तीन वेळा विकलं, प्रत्येकवेळा तो प्रामाणिकपणे माझ्याकडे परत आला !!!

बंधुप्रेम !

शिक्षक : मुलांनो निष्पाप आणि मुक्या प्राण्यांवर आपण प्रेम करायला हवे, मी जर कुणा माणसाला एका निष्पाप गाढवाला मारतांना बघितले तर मी काय करायला हवे ?
वर्ग : त्याला थांबवायला हवे .
शिक्षक : बर मी त्याला मारण्यापासुन थांबवले तर हे काय दाखवते ?
वर्ग एका स्वरात : बंधुप्रेम !!!

प्रार्थना.

शिक्षीका : मुलांनो सांगा तुम्ही जेवणापूर्वी काय करता ?

मुले :बाई आम्ही हात - पाय स्वच्छ धुतो आणि त्यानंतर जेवायला बसतो.

शिक्षीका : शाब्बास मुलांनो. जेवणापूर्वी हात- पाय स्वच्छ धुवावे आणि देवाची प्रार्थना कोण-कोण करते ?

वर्ग : बाई आमच्या आईला छान स्वयंपाक करता येतो. त्यामुळे आम्ही देवाची प्रार्थना करित नाही.

सांताचा व्यवसाय

सांतासिंगने बराच खर्च करून पंजाब मधे सलून उघडले साहजीकच त्याला ते लवकरच बंद करावे लागले. बराच विचार करुन त्याने एक फोटो स्टुडिओ उघडला.

त्याला एका मॄत व्यक्तिचा फोटो काढायला बोलावण्यात आले. सांता तयार झाला. अंत्य यात्रेच्या अगोदर वेळेवर कॅमेरा घेवून पोहचला.

सर्व तयारी झाल्यावर फोटो काढायला सांगण्यात आले.

आणि काही कळायच्या आत तिथल्या लोकांनी त्याला मारायला सुरुवात केली.

कारण...

.

.

.

.

.

.

त्याने प्रेता कडे पाहून म्हटले "स्माईल प्लिझ ".

बॉंब.

सांतासिंग आणि बांतासिंग दोघे भाऊ एकदा बॉंब टाकून एक ईमारत उडवायचा कट रचतात. बॉंब तयार होतो आणि ते बॉंब आपल्या मोटारीत ठेवून त्या ईमारतीकडे जायला निघतात. रस्त्यात बांतासिंगच्या डोक्यात एक विचार येतो कि हा बॉंब गाडीतच फुटला तर काय होईल.
बांता : अरे सांता माझ्या डोक्यात एक विचार आला हा बॉंब रस्त्यातच आपल्या गाडीतच फुटला तर काय होईल ?
सांता : अरे काळजी करु नकोस. मी दुसरा बॉंब घरी तयार ठेवला आहे.

मदत !

मन्या : नन्या तु आईला घरच्या कामात मदत करतोस का ?
नन्या : हो करतोना, आईने सांगितलेली सगळी कामे करतो.
मन्या : कोणती कामे ?
नन्या : भाजी आणणे, वाण्याकडून सामान आणणे व आई सांगेल ती सगळी. तु मदत करतोस कां आईला कामात ?
मन्या : हो, आई सोबत वाण्याकडे जाणे, आई घर झाडत असतांना पाय वर करुन बसणे, आईला गाद्या उचलायच्या असतांना खुर्चीवर बसणे, आईने फरशीवर पसारा करु नको म्हटल्यावर गादीवर पसारा करणे इत्यादी सर्व कामे करतो.

वाटणी !

दोघा पुजार्‍यां मधे चर्चा सुरु असते.

पहिला : तु देवळात जमा होणार्‍या पैशाची वाटणी कशी करतोस ?

दुसरा : तसे काही विशेष नाही. मी फरशीवर एक वर्तुळ काढतो व जमा होणारे पैसे लांबून वर्तुळात फेकतो. वर्तुळात राहिलेले माझे तर वर्तुळा बाहेर गेलेले देवाचे. तु काय करतोस.

पहिला : मी ही असेच करतो फक्त वर्तुळाबाहेर गेलेले माझे असतात.

तितक्यात एक माणूस तिथे येतो व त्यांना सांगतो. यापेक्षा सोपा उपाय मी सांगतो. तुम्ही पैसे वर फेका वर राहिलेले देवाचे तर खाली येणारे तुमचे ठेवा.

समानता.

राम, कॄष्ण, गांधी, आंबेडकर या सर्वांमधे काय समानता आहे.
सरदार : हे सर्व राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी जन्माला आले.

नाणे.

सांतासिंग : अरे बांता, मला सांग माझ्या खिशात किती नाणे आहेत.
बांतासिंग : मी सांगतो, पण एका अटिवर.
सांतासिंग : काय ?
बांतासिंग : त्यातील एक नाणे मला देशिल ?
सांतासिंग : हो तु ओळखलस तर एकच काय दोन्हिही देईन.

शर्यत.

लालूप्रसाद : काय झालं, हे सगळे का धावताहेत ?

एक माणूस : सर, हि धावण्याची शर्यत आहे. जिंकणार्‍याला बक्षिस मिळणार आहे.

लालूप्रसाद : जिंकणार्‍याला बक्षिस मिळणार तर बाकिचे का धावताहेत ?

बहिरे आजोबा !

गोखले आजोबांना बरीच वर्षे निट ऎकू येत नव्हते. त्यांना काटकर आजोबांनी फडके डॉक्टरांचा पता दिला.
फडके डॉक्टरांनी त्यांना निट तपासल्यावर एका महिन्याचे औषध दिले.
गोखले आजोबा एका महिन्या नंतर डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले, " कसे वाटतेय आजोबा. ?"
आजोबा, " डॉक्टर, कमालच झाली. मी अजुन घरी कुणालाही सांगीतले नाही मला ऎकू येते ते. त्यामुळे मला माझे मॄत्युपत्र तीन वेळा बदलावे लागले !"

भूक.

एकदा एक सिंह आणि एक ससा एका हॉटेल मधे सोबत जातात.

वेटर दोघांनाही बसायला जागा देतो। सशाला विचारतो, " सर, तुम्हाला खायला काय आणु ? "

ससा सिंहासमोर ऎटीत सांगतो, " माझ्यासाठी एक प्लेट गाजर आण, बघ चांगले हवेत. "

वेटर घाबरत सिंहाकडॆ बघतो आणि विचारतो, " सर, तुम्हाला काय आवडेल ?"

ससा त्याला सांगतो, " त्यांना आज काहिही नको. "

वेटर, " कां ? त्यांना भूक नाही कां ?"

ससा, " अरे, त्यांना भूक असती तर तुला काय वाटते मी इथे राहिलो असतो कां ? "

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...