--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: जून 2008

तळटीप.

जोशी आजोबांना वय झाल्यामुळे दिसत नव्हते. आजींना जावूनही बरीच वर्षे झालीत. विरंगुळा एकच कोणातरी नातेवाईकाला पत्र लिहीणे.

असेच एकदा आजॊबा पोस्टात गेले. पोस्टकार्ड विकत घेतलं व जवळच बसलेल्या एका तरुणाला पत्र लिहून देण्याची विनंती केली, " बेटा मला निट दिसत नाही व हातही फार हलतो. मला एक पत्र लिहून देतोस कां ?

तरुण आजोबांना मदत करायला तयार झाला.

पत्र लिहून झाल्यावर आजोबांनी ते वाचले. आजोबांचा चेहरा बघून तो तरूण म्हणाला, " आजोबा काही चुकले कां ?"

"नाही बेटा नाही चुकले", आजोबा म्हणाले, " फक्त एक तळटीप घाल, वाईट हस्ताक्षरासाठी क्षमस्व."

अपघात.

संताला कळले त्याच्या घराजवळ अपघात झालाय. संता अपघात बघायला गेला.
अपघातस्थळी एक माणूस विव्हळत होता, ”अरे देवा! माझा हात, माझा हात तुटलाय SSSSS”
संता त्याच्यावर डाफरला, ”ए गप बस ! हात तुटला, हात तुटला म्हणून विव्हळतोयस किती ! तो पलीकडचा माणूस बघ. त्याचं तर डोकंच तुटून पडलंय. रडतोय का तो?!!!!”

विद्यार्थी.

तो : मला आपल्या शाळेत प्रवेश मिळेल कां ?

शाळेतील कर्मचारी : हो, मिळेल ना.

तो : पण, मला लिहीता किंवा वाचता नाही येत.

शाळेतील कर्मचारी : काही हरकत नाही.

तो : मग प्रवेश द्या.

शाळेतील कर्मचारी : हा घ्या, हा प्रवेश अर्ज भरा.

बचाव ! बचाव !!!!!

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधिल बातमी वाचली कां ? बातमीची लिंक : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3169754.cms
बातमी जशीच्या तश्शी !
म. टा. प्रतिनिधी। ठाणे प्रचंड गदीर्ने वाहणाऱ्या ठाणे रेल्वे स्टेशनात रात्री आठच्या दरम्यान एका महिलेच्या 'बचाव, बचाव'च्या आरोळीने एकच गोंधळ उडाला. ना-ना शंका येऊन शेकडो प्रवासी पळू लागल्याने चेंगराचेंगरीही झाली. पण खरे कारण समजले आणि मग मात्र सर्वांनी कपाळावर हात मारला. रात्रीचे आठ वाजलेले. ठाणे रेल्वे स्टेशनात गदीर् उसळली होती. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर गलका झाला. 'बचाव, बचाव' अशी आरोळी ठोकत एक महिला जिवाच्या आकांताने धावत सुटली. कुणाला वाटलं बॉम्बस्फोट झाला, तर कुणाला वाटलं आग लागली. सारे प्रवासी सैरावैरा पळू लागले. चेंगराचेंगरी झाली. कुणी प्लॅटफॉर्मवरून उड्या मारल्या. तर कुणी गटारात पडले. काही वेळातच सारे प्लॅटफॉर्म निर्मनुष्य झाले. लोहमार्ग पोलिसही अपघात झाल्याचे समजून स्टेचर्स घेऊन धावले. कँटिन आणि इतर स्टॉलही धडाधड बंद झाले. पंधरा मिनिटांनी हा सारा गोंधळ थांबला. सर्व काही आलबेल असल्याचे पोलिसांना समजले. मग त्या महिलेच्या ओरडण्याचे कारण काय, याचा शोध सुरू झाला आणि त्याचे खरे कारण समोर आले. अंगावर पाल पडल्याने ती महिला ओरडत सुटली होती, असे ती घटना पाहिलेल्या एका स्टॉलवाल्याने पोलिसांना सांगितले. या चेंगराचेंगरीत कुणी जखमी झाले नाही. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवरून रुळावर उड्या मारल्या तेव्हा कोणतीही लोकल त्या मार्गावर धावत नव्हती. त्यामुळे दुर्घटना टळली.
एका वाचकाच्या म्हणण्याप्रमाणे याला मी विनोद या रुपात नाही तर एक प्रसंग या रुपात कायम ठेवत आहे. आपल्यावर असा प्रसंग आल्यास कॄपया अशा गोष्टीने दहशत पसरणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी.

न्याय.

न्यायाधिश : "बाई तुमच्यावर आरोप आहे कि तुम्ही आपल्या नवर्‍याला खुर्ची फेकून मारली. तुम्ही असं का केलं ?"
बाई : "न्यायाधिश महाराज, माझ्याकडे काहिच उपाय नव्हता. टेबल फारच वजनी होता, त्यामुळे मला तो उचलता नाही आला."

बैलगाडी

सांतासिंग एका नोकरिच्या मुलाखातीसाठी जातो. त्या वेळेसचा एक प्रश्न.

परिक्षक : तुम्हाला Ford माहित आहे काय ? ते काय आहे ?

सांतासिंग : सर ते एका गाडीचे नाव आहे.

परिक्षक : तुम्हाला Oxford माहित आहे काय ?

सांतासिंग : सर हो, Oxford म्हणजे बैलगाडी.

शोध.

शिक्षक : मुलांनो, फळ्याजवळ जाऊन नकाशावर अमेरिका कुठे आहे हे कोण दाखवू शकते कां ?

बाळू : सर, मी दाखवतो.

(बाळू अमेरिका कुठे आहे ते बरोबर दाखवतो.)

शिक्षक : शाब्बास बाळू.

शिक्षक : आता सांगा, मुलांनो अमेरिकेचा शोध कुणी लावला.

सगळा वर्ग एका स्वरात : बाळूने SSSSSSSSS.

अपयशी सेल्समन !

एक सेल्समन आपण चांगलं बोलू शकत नाही व त्यामूळे आपल उत्पादन विकू शकत नाही याची जाणिव झाल्यावर आत्महत्या करायला नदिवर जातो.

तो नदित उडी मारणार तितक्यात एक हवालदार त्याला बघतो व विचारतो ," तु आत्महत्या करणे योग्य नाही. घाबरट लोक असा मार्ग निवडतात. शिवाय मेला नाहीस तर तुझ्यावर खटला देखील दाखल केला जावू शकतो. तु आपल्या घरच्यांबद्दल पण विचार केला पाहिजे.............. ".

हवालदार त्याला आत्महत्येपासून परावॄत्त करण्यासाठीचे सर्व मार्ग वापरतो.

सेल्समन त्यानंतर बोलतो व आत्महत्या करणे कां व कसे चांगले आहे ते सांगतो.

थोड्याचेळाने हवालदार आत्महत्या करतो व सेल्समन परत येतो !

गुण !

दोन मित्र लग्ना बद्दल आपसात गप्पा करत होते.

एक म्हणाला, " मी ऎकलंय नवरा बायकोत विरुद्ध गुण असल्यास लग्न टिकते. "

दुसरा, " हो मी पण ऎकलंय . म्हणुन तर मी श्रीमंत मुलगी शोधतो आहे, लग्न करायला !!!"

बॅंक लूटारू !

पोलीस ईंस्पेक्टर : " सर्व बाहेर जाणारे दरवाजे बंद करण्यात यावेत आणी बॅंकेत असलेल्या ग्राहकांना सुरक्षा देण्यात यावी. "

तरिही बॅंक लूटणारे सुटतात.

ईंस्पेक्टर : बाहेर जाणारे दरवाजे बंद करायला सांगीतल्यावरही लूटारू कसे सुटले ?

हवालदार : साहेब, आपण सांगीतल्यासारखेच आम्ही बाहेर जाणारे दरवाजे बंद केलेत. पण आपण आत येणार्‍या दरवाज्यांबद्दल काहिही बोलला नाहीत. त्यामूळे ते उघडेच होते. लूटारू त्या दरवाज्यातून गेले असावेत.

माफी !

नमस्कार, मी या विमानाचा पायलट बोलतोय. आपण आमच्या कंपनीच्या विमानात मुंबई ते दिल्ली प्रवास करीत असल्याबद्दल धन्यवाद.

आपण सध्या ४०००० फुटांवर असून बाहेरच तापमान -४० अंश आहे. बाहेरचं वातावरण स्वच्छ असुन आपण सुरक्षीत आहोत. अरे SSSSSSS बापरे.............

( विमानात थोड्यावेळ स्मशान शांतता पसरते. काही वेळाने पायलट परत बोलतो. )

माफ करा आपल्याला कदाचित भिती वाटली असेल. पण मला कॉफीचा कप घेत असतांना धक्का लागला व गरम कॉफी पायावर पडली व त्याचा चटका बसला. आपण माझी पॅंट बघू शकता कॉफीने समोर पायावर खराब झाली आहे.

"आपण बघू शकता माझीतर माघून खराब झाली आहे. " एक प्रवासी ओरडला.

हाडाचा कवि.

कविवर्य सोपानदेव चौधरी अन्ननलिकेच्या कॅन्सरने आजारी असतांना त्यांना एका कविसंमेलनाचे आमंत्रण गेले. तेंव्हा सोपानदेवांनी संचालकांना लिहीले ," अंगात रक्त नसल्यामुळे मी विरक्त झालो आहे, अंगावर मास नसल्यामुळे मी आता खराखुरा हाडाचा कवि उरलो आहे. त्यातुन स्ट्रेचर आणि फ्रॅक्चर ह्या चराचरांनी मला व्यापून टाकल्याने मला सोपान चढता येत नाहीत तेंव्हा क्षमा असावी."

करुणास्पद

एकदा वि. स. खांडेकर ना. सि. फडक्यांकडे गेले असताना स्वत:च्या दॄष्टीदोषाच्या गोष्टी सांगू लागले. तेंव्हा फडके त्यांना म्हणाले, " आपण असे करू या. माझे कान गेले, तुमची दॄष्टी गेली, अत्र्यांचे पाय गेले. कोणती आपत्ती जास्त करुणास्पद या विषयावर आपल्या तिघांचा जाहीर परिसंवाद ठेवू. श्रोत्यांची खूप गर्दी होईल नाही का ?"

सरळ वळणाचा !

पु. ल. देशपांडे एका ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे."

युक्ती.

एक लहान मुलगा एका घराबाहेर बेल वाजवायचा प्रयत्न करीत होता. काही केल्या त्याचा हात बेलच्या बटन पर्यंत पोहचत नव्हता.

समोरून जाणार्‍या एका माणसाच्या हे लक्षात आले व तो त्या लहान मुलाच्या मदतीला गेला. त्या माणसाने त्या मुलासाठी बेल वाजवली व कौतुकाने त्या मुलाकडे बघितले व म्हणाला, " आता काय ? "

तो मुलगा म्हणाला , " काका कोणी बाहेर येण्यापूर्वी आपण दोघेही पळून जाऊया !!!"

साष्टांग नमस्कार !

आचार्य अत्रे यांच्या "साष्टांग नमस्कार" या नाटकातील एक प्रसंग :
एक पात्रे दुसर्‍या पात्राला म्हणते, " अरे मी पण सिनेमात काम केलंय."
दुसरं पात्र विचारतं, " कोठल्या सिनेमात ? कोणती भूमिका ?"
त्यावर पहिला उत्तरतो, " अलिबाबा आणि चाळीस चोर या चित्रपटात मी एकोणचाळीसाव्या चोराचे काम केले होते,"
दुसरं पात्र विचारतं," पण आम्हाला तुम्ही कसे दिसला नाही ? आम्ही तो सिनेमा पाहिलाय !"
तसं पहिलं पात्र म्हणते," पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही मुळी तेलाच्या बुदल्यातबसून होतो. मग तुम्ही कसे पाहणार ?"

डेंटिस्ट.

आई मी मोठ्ठा झाल्यावर सगळे मला घाबरणार.

आई : का रे तुला काय व्हायचं आहे ? बॉक्सर कि कुणी पैलवान ?

नाही गं आई मला डेंटिस्ट व्हायचे आहे.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...