मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

May, 2008 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उद्याचे काम आजच !

आई आज बाईंनी शिकवलं उद्याच काम आजच कराव. मी पण यापुढे असच वागणार.
शाब्बास बेटा.
तर आई मी अस करतो उद्याचे चॉकलेटपण आजच संपवून टाकतो !!!

कारणे !!!

आई : अरे सुहास ऊठ. तुला कॉलेजला जायचे आहे ना ?


सुहास : आई मी आज कॉलेजला नाही जाणार.


आई : सुहास तुला कॉलेजला जावच लागेल.


सुहास : नाही आई मी नाही जाणार.


आई : मला दोन कारणे सांग तुला का नाही जायचं .


सुहास : सगळी मुलं माझा राग करतात. सगळे शिक्षकही माझा राग करतात.


आई : चल ऊठ आणि तयार हो.


सुहास : मला दोन कारणे सांग. मी कॉलेजला का जावं.


आई : तुझं वय आता ५५ वर्षे आहे . तू कॉलेजचा प्राचार्य आहेस.

लग्नाची एक्सपायरी !

बायको : अहो, काय करताय ?नवरा : काही नाही गं.बायको : नाही, मी बघतेय मघापासून.......नवरा : काय, काय बघतेयस मघापासुन ?बायको : अहो, तुम्ही असे आपले मॅरेज सर्टिफीकेट का बघताय गेल्या तासाभरापासुन ?नवरा : काही नाही गं ! बघतोय कुठे एक्सपायरी डेट आहे का त्यावर !!!

तिरंगा.

एकदा मुंबईतल्या सगळ्या भैय्या लोकानी स्वातंत्र्यदिन साजरा करायचे ठरवले.

एका भैय्यावर तिरंगा झेंडा विकत आणायची जबाबदारी सोपवण्यात आली.

भैयाने आपल्यासोबत आणखी एका भैय्याला घेतले.

सर्वच दुकानात सारखेच झेंडे बघून ते वैतागले.

शेवटी त्यांनी कंटाळून एका दुकानदाराला विचारले, " इसमे कोई दूसराभी रंग होगा तो देना. सबही लोग एकही रंगका तिरंगा क्यों बेच रहे है ? "

विमा !

एक विमा एजंट आपल्या बायकोला कार चालवणे शिकवत होता. वेग थोडा वाढल्यावर त्याच्या लक्षात आले कि गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. त्याने बायकोला तशी कल्पना दिली.

बायको : आता मी काय करू ?

एजंट : काहीही कर पण लक्षात ठेव फार महागड्या वस्तुला धडक देवू नको. त्याची भरपाई आपल्याला महागात पडेल !

घाई

डॉक्टर आपल्या दारुड्या मित्राला : अरे, तुला माहितेयना दारू पिणार्‍याला दारू हळू हळू मारते. मित्र : हो, मला माहित आहे. म्हणून तर पितो. मरायची घाई कोणाला आहे ईथे !!!

हा ! हा !! हा !!!

एक पारितोषीक वितरण समारंभात बोलावलेल्या एका राजकिय नेत्याने म्हटले," आजच्या या क्रिडा स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभाला मला बोलावल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. मला सांगण्यात आले आहे कि या स्पर्धेत एकूण २६ संघांनी भाग घेतला व फायनलला दोन संघात फार चांगल्या वातावरणात स्पर्धा झाली." " मला या गोष्टीचे फार फार वाईट वाटले कि एकूण २६ संघांनी स्पर्धेत भाग घेतल्यावरही फायनलला एकूण दोनच संघ पोहोचले" " मी आयोजकांना सांगु इच्छितो कि पुढच्या वर्षी या स्पर्धेत आणखी जास्त संघांनी भाग घ्यावा व फायनलला पोहोचणार्‍या संघांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढावी."

डॉक्टर.

डॉक्टर आपल्या मित्राला, " तुला खरं सांगतो मी या उगाचच करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियेच्या विरोधात आहे. मी यांच समर्थन कधिच करु शकणार नाही."
मित्र, " तर तु शस्त्रक्रियेचा निर्णय कधि घेतोस"
डॉक्टर, " मला जेंव्हा जेंव्हा पैशाची गरज भासते !"

मासेमार.

एकदा सरदार सांतासिंग व त्याचे दोन मित्र रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसले होते. सांतासिंग मधे बसून पेपर वाचत होता तर त्याचे मित्र त्याच्या दोन्ही बाजूला बसून मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसले होते.
त्यांचे हे वेडेचाळे येणारे-जाणारे बघत होते व हसत होते. काही वेळाने गर्दी बरिच वाढली.
गर्दी बघुन एक हवालदार तेथे आला व मासे पकडणार्‍या एकाला दरडावून विचारले, " काय करताय ?"
तो म्हणाला," मासे पकडतोय."
हवालदार भडकला व त्याने सांतासिंगला विचारले हे काय करताहेत ?
सांतासिंग म्हणाला ते मासे पकडताहेत.
हवालदाराने काठी उगारली व विचारले हि काय मासे पकडायची जागा आहे कां ?
काठी उगारलेली बघताच सांतासिंग बोट वल्हवल्यासारखे करू लागला.

माशी.

डॉक्टर, डॉक्टर मला वाटते मी माशी झालोय.

डॉक्टर : मला वाटते, तुम्हाला डॉक्टर नाही तर मानसोपचाराची गरज आहे. तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे जा.

पेशंट : हो डॉक्टर मी त्यांच्याचकडे निघालो होतो. पण तुमच्याकडे दिव्याचा उजेड दिसला अन इकडे वळलो.

गुप्तहेर.

"काय हो, तुम्ही पोलीस कां ? " एक माणूस पोलीसाच्या गणवेशातल्या माणसाला
"नाही, मी गुप्तहेर आहे."
"मग तुम्ही हा गणवेश का घातला आहे"
"आज मी रजेवर आहे !"

प्लॅटफॉर्म तिकीट.

श्री देसाई त्यांच्या हट्टी, हेकेखोर व मुर्खपणा साठी प्रसिद्ध. तसेच त्यांना त्यांच्या पैशाचा फार दुराभिमान.
एकदा ते एका नातेवाईकाला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले, अर्थातच गरज होती प्लॅटफॉर्म तिकीटाची.
ते तिकीट खिडकीवर गेले व कारकूनाला फर्स्ट क्लासचे प्लॅटफॉर्म तिकीट मागितले. कारकूनाने असे तिकीट मिळत नसल्याचे सांगूनही श्री देसाईंना ते पटेना.
तेंव्हा स्टेशन मास्तरला भेटून त्यांनी रेल्वे मंत्रालयाला तसे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी पत्र लिहीण्यास सांगीतले व ते स्वत:ही त्या प्रयत्नात आहेत !

बॉस

बॉसच्या सवयीला कंटाळलेल्या एकाने त्याच्या बॉसला पाठविलेलं एक पत्र.
प्रिय बॉस,
आपण या कार्यालयात आल्यापासुन कामाची मजा लूटण्याचा प्रसंग आमच्यावर वारंवार येत आहे याबद्दल धन्यवाद.
दिवसभर गप्पा झाल्यावर आपण बरोबर ४.३० वाजता बोलावून घरी जाण्यापूर्वी जे काम पूर्ण करुन जा असे सांगता ते आम्हा सर्वांना फार्फार आवडते. आपण ही सवय कायम ठेवावी हि विनंती.
जाण्यापूर्वी तासाभरात काम पूर्ण करायचे चॅलेंज रोजच स्विकारण्याने आमची ताकद वाढत चालली आहे व यासाठी आपले आभार कसे मानावे कळत नाही.
तरी आपण असेच दिवसभर वाट्टेल त्या गप्पा करुन ४.३०ला काम देत जावे हि परत एकदा सर्वांतर्फे विनंती.
आपला,
बाळू.

बाळूचे गणित.

शिक्षक : बाळू समजा मी तुला दोन ससे दिलेत आणखी दोन ससे आणखी दोन ससे दिलेत तर तुझ्याकडे एकूण किती ससे झालेत ?

बाळू : सात.

शिक्षक : परत ऎक, समजा मी तुला दोन ससे दिलेत आणखी दोन ससे आणखी दोन ससे दिलेत तर तुझ्याकडे एकूण किती ससे झालेत ?

बाळू : सात.

शिक्षक : आपण उदाहरण बदलु या. समजा मी तुला दोन संत्री दिलीत आणखी दोन संत्री आणखी दोन संत्री दिलीत तर तुझ्याकडे एकूण किती संत्री झालीत ?

बाळू : सहा.

शिक्षक : शाब्बास, संत्री सहा तर तुझ्याकडे ससे कसे सात होणार ?

बाळू : माझ्याकडे अगोदरच एक ससा आहे नां !

नो पार्किंग.

एक तरुण मोटरसायकल स्वार पोलीसाला : " काय साहेब मी माझी मोटरसायकल इथे ठेऊ शकतो कां ? "

पोलीस : नाही, हे बघा तो बोर्ड "येथे वाहने उभी करु नये".

तरुण : तर येथे इतकी वाहने कशी काय उभी आहेत ?

पोलीस : त्यांनी मला विचारले नाही !

विमान प्रवास.

श्री. देसाई पहिल्यांदाच विमान प्रवास करीत होते.
त्यांनी विमान कंपनीच्या कार्यालयात दूरध्वनी करून विचारले, " मला मुंबई ते दिल्ली प्रवास करायचा आहे. विमान किती वेळात पोहचेल ?"
कंपनीचा फोनवरिल माणूस म्हणाला," सांगतो, एक मिनीट हं "
देसाई : धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, आपला फार आभारी आहे !

संकट.

राजसाहेबांच्या शिवतीर्थावरील सभेनंतर श्री. लालूप्रसाद यादव दोन दिवस फारच गप्प होते. पत्रकार त्यांना छेडत होते पण लालूप्रसाद काहिही बोलेनात.
बरेच दिवसांनी त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली.
"हमरा बिहारी लोग जिंदगी भरमे ठिक तरिकेसे हिंदी नही बोल सकता है उपर से ये राज ठाकरे हमरा लोगोको महाराष्ट्रमे रहने के लिये मराठी सिंखने बताता है. यह तो बहुत नाईंसाफी कर रहा है."

हायर स्टडी.

एक युपीचा भैया व एक बिहारी बाबू मित्र होते. एकदा बिहारी बाबूने बघितले कि भैया सकाळी उठुन काही पुस्तके घेउन जवळच्या टेकडीकडे चालला आहे. बिहारी बाबूला राहवले नाही. तो भैयाकडे गेला व विचारले, " भैया सकाळी सकाळी पुस्तके घेउन कुठे जात आहेस ?" भैया म्हणाला," भई सब लोक स्टडी करता है. हम को लगा हम हायर स्टडी करना चाहिये इस लिये हम ऊपर चढकर हायर स्टडी करना चाहता हूं."

हास्यदिनाच्या शुभेच्छा.

आजच्या धावपळीच्या जीवनात हसायला वेळ काढणे अवघड झाले आहे. आपण येथे दोन क्षण हसायला येता आपले आभार व आजच्या हास्यदिनाच्या आपल्याला अनेक शुभेच्छा. आपल्या जीवनांत हास्याचे क्षण वारंवार येवोत हिच या दिवसाची शुभेच्छा. आपण हसत रहा व आपल्या परिवारातील सगळ्यांना हसत ठेवा.दंतवैद्य.

दंतवैद्य : दात किडलेला आहे. काढावा लागेल. काही काळजी करु नका काही मिनिटांचचं काम आहे.
रुग्ण : किती पैसे लागतील ?
दंतवैद्य : ६०० रुपये.
रुग्ण : काही मिनिटांचे ६०० रुपये ?
दंतवैद्य : काही हरकत नाही सावकाश काढतो !

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! महाराष्ट्र राज्याची "सर्वोत्तम" प्रगती व्हावी हिच "सर्वोत्तम मराठी विनोदची" ईश्वर चरणी प्रार्थना.