Olx

बुधवार, १६ एप्रिल, २००८

व्यवस्थापन : Management !

एका संस्थेत व्यवस्थापक (Manager) बदलायची प्रक्रिया सुरु असते.

नविन येणार्‍या व्यवस्थापकास जुन्या व्यवस्थापकासोबत काही दिवस काम करण्यास सांगण्यात येते.

शेवटचा दिवस येतो. जुना व्यवस्थापक नव्यास तीन पाकिटे देतो व सांगतो, " काही अडचण आल्यास पहिलं पाकीट उघड व त्यात सांगितल्याप्रंमाणे निर्णय घे"

सात आठ महिने सहज जातात व एक दिवस एक मोठ्ठा प्रश्न त्या नविन व्यवस्थापकापुढे उभा रहतो. बराच विचार केल्यावर त्याला आठवते कि जाताना जुन्या माणसाने तीन पाकिटे दिली होती. तो सांगीतल्याप्रमाणे पहिले पाकिट उघडतो. त्यात लिहीले असते सर्व दोष जुन्या माणसावर सोपवा. तो त्याप्रमाणे सर्व दोष जुन्या व्यवस्थापकावर लादतो. त्याचे प्रश्नं सुटतात.

काही महिने गेल्यावर परत प्रश्न उभा रहतो. त्यात लिहील्याप्रमाणे तो निर्णय घेतो आणि सर्व सुरळीत चालू लागते.

परत काही महिन्याने तो संकटात येतो. त्याला तिसरे पाकिट आठवते. तो ते पाकिट उघडतो व मजकूर वाचतो, " तीन पाकिटे तयार करायला लागा."

Olx