Olx

शनिवार, २६ एप्रिल, २००८

देवभक्त.

रामभाऊ परम देवभक्त होते.
एकदा गावात महापुर आला. रामभाऊ पुर उतरायची वाटबघत घराबाहेर कट्ट्यावर बसले होते.
त्यांना वाचवायला एक माणूस होडी घेऊन आला. रामभाऊंना म्हणाला चला. रामभाऊ म्हणाले, " नको, तो देवच वाचवेल मला."
पाणी चढत होतं रामभाऊ थोड्या उंचीवर जावून बसले.
थोड्यावेळाने दुसरा माणूस आला. त्यालाही रामभाऊ म्हणाले, " नको, तो देवच वाचवेल मला."
पाणी फारच चढलं. रामभाऊ घराच्या छपरावर जावून बसले.
काही वेळाने हेलिकॉप्टर आलं.
त्यातल्या माणसांनापण रामभाऊ तेच म्हणाले, " नको, तो देवच वाचवेल मला."
त्यानी परत विचारल्यावर रामभाऊ आपल्या मतांवर ठाम होते.
आणि व्हायचे तेच घडले. रामभाऊ पुरत वाहून गेले.
स्वर्गात गेल्यावर त्यांना देव भेटताच त्यांनी देवाला विचारले, " देवा, कुठे होतास तु ? , मला वाटले संकटात तु मला वाचवशील. "
देव म्हणाला, " दोन बोटी पाठवल्या, एक हेलीकॉप्टर पाठवले, तुझ्यासाठी आणखी काय पाठवायला हवे होते ! "

Olx