Olx

गुरुवार, २४ एप्रिल, २००८

विमानात वकिल.

एकदा एका विमानात एक डॉक्टर, एक धर्मगुरु, एक दहा वर्षाचा विद्यार्थी व एक वकिल प्रवास करीत होते.

काही वेळाने पायलट ने उद्घोषणा केली, " मी या विमानाचा पायलट बोलत आहे, थोड्याच वेळात आपले विमान काही बिघाडा मुळे कोसळणार आहे. विमानात काही मोजकेच पॅराशूट शिल्लक आहेत."

घोषणा केल्याबरोबर पायलट व को-पायलटने आपले पॅराशूट घेवून विमानातून उडी टाकली.

विमानातील प्रवाशांनी लगेच ठेवलेले सामान बघितले. त्यात तीनच पॅराशूट होते.

डॉक्टरने त्यातील एक पॅराशूट घेतले व म्हणाला," माझ्यासारखे दोनच तज्ज्ञ या जगात आहेत. मी जर जगलो तर लक्षावधी लोकांचे प्राण वाचतील. म्हणुन मी स्वत:ला वाचवित आहे" असे सांगुन त्याने विमानातुन उडी घेतली.

वकिल पुढे आला व म्हणाला," माझ्या सारखे हुशार वकिल फार कमी आहेत, त्यामुळे मी पण स्वत:ला वाचवित आहे." व तोही गेला.

धर्मगुरू पुढे आला व त्या मुलाला म्हणाला," बेटा, माझे जीवन कार्य संपले आहे. आता मी समाधानी आहे व मरायला तयार आहे. तुला तुझे आयुष्य घालवायचे आहे. जा, तीसरे पॅराशूट घे व स्वत:ला वाचव. जा तुला देव खुप आयुष्य देवो. "

मुलगा पुढे आला व म्हणाला," महाराज, घाबरु नका. आपल्याकडे अजून दोन पॅराशूट शिल्लक आहेत. तो हूशार वकिल पॅराशूट नाही, तर माझी बॅग घेवून गेला !"

Olx