Olx

गुरुवार, १७ एप्रिल, २००८

त्याग.

एकदा एका गावात महापुर आला. गावकर्‍यांना वाचवण्याचे बरेच प्रयत्न करण्यात येत होते. वाचवण्याचा वेग वाढवण्यास लष्कराला पाचारण करण्यात आले.

लष्कर आले व असा विचार करण्यात आला कि हेलिकॉप्टर आणण्याशिवाय मार्ग नाही.

हेलिकॉप्टर आले.

लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर खाली आल्यावर सोडलेल्या दोराला बरेच लोक लटकले. नंतर असे लक्षात आले कि दोर लटकलेल्या लोकांसाठी पुरेसा नाही. काही लोकांनी दोर सोडल्यास बरे होईल.

पण दोर सोडायला कोणीही तयार नव्हते.

शेवटी त्या दोराला लटकलेल्या एका बाईने सांगीतले ," सर्वच संकटाच्या वेळेस बाईनेच त्याग केलेला आहे. तर मी पण या संकट समयी तसाच त्याग करायला तयार आहे......."

आणि बाईंचे बोलणे संपताच सर्व पुरुषांनी टाळ्या वाजवायला दोर सोडून दिला !

Olx