मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

April, 2008 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देवभक्त.

रामभाऊ परम देवभक्त होते. एकदा गावात महापुर आला. रामभाऊ पुर उतरायची वाटबघत घराबाहेर कट्ट्यावर बसले होते. त्यांना वाचवायला एक माणूस होडी घेऊन आला. रामभाऊंना म्हणाला चला. रामभाऊ म्हणाले, " नको, तो देवच वाचवेल मला." पाणी चढत होतं रामभाऊ थोड्या उंचीवर जावून बसले. थोड्यावेळाने दुसरा माणूस आला. त्यालाही रामभाऊ म्हणाले, " नको, तो देवच वाचवेल मला." पाणी फारच चढलं. रामभाऊ घराच्या छपरावर जावून बसले. काही वेळाने हेलिकॉप्टर आलं. त्यातल्या माणसांनापण रामभाऊ तेच म्हणाले, " नको, तो देवच वाचवेल मला." त्यानी परत विचारल्यावर रामभाऊ आपल्या मतांवर ठाम होते. आणि व्हायचे तेच घडले. रामभाऊ पुरत वाहून गेले. स्वर्गात गेल्यावर त्यांना देव भेटताच त्यांनी देवाला विचारले, " देवा, कुठे होतास तु ? , मला वाटले संकटात तु मला वाचवशील. " देव म्हणाला, " दोन बोटी पाठवल्या, एक हेलीकॉप्टर पाठवले, तुझ्यासाठी आणखी काय पाठवायला हवे होते ! "

विमानात वकिल.

एकदा एका विमानात एक डॉक्टर, एक धर्मगुरु, एक दहा वर्षाचा विद्यार्थी व एक वकिल प्रवास करीत होते.
काही वेळाने पायलट ने उद्घोषणा केली, " मी या विमानाचा पायलट बोलत आहे, थोड्याच वेळात आपले विमान काही बिघाडा मुळे कोसळणार आहे. विमानात काही मोजकेच पॅराशूट शिल्लक आहेत."
घोषणा केल्याबरोबर पायलट व को-पायलटने आपले पॅराशूट घेवून विमानातून उडी टाकली.
विमानातील प्रवाशांनी लगेच ठेवलेले सामान बघितले. त्यात तीनच पॅराशूट होते.
डॉक्टरने त्यातील एक पॅराशूट घेतले व म्हणाला," माझ्यासारखे दोनच तज्ज्ञ या जगात आहेत. मी जर जगलो तर लक्षावधी लोकांचे प्राण वाचतील. म्हणुन मी स्वत:ला वाचवित आहे" असे सांगुन त्याने विमानातुन उडी घेतली.
वकिल पुढे आला व म्हणाला," माझ्या सारखे हुशार वकिल फार कमी आहेत, त्यामुळे मी पण स्वत:ला वाचवित आहे." व तोही गेला.
धर्मगुरू पुढे आला व त्या मुलाला म्हणाला," बेटा, माझे जीवन कार्य संपले आहे. आता मी समाधानी आहे व मरायला तयार आहे. तुला तुझे आयुष्य घालवायचे आहे. जा, तीसरे पॅराशूट घे व स्वत:ला वाचव. जा तुला देव खुप आयुष्य देवो. "
मुलगा पुढे आला व म्हणाला,"…

कर्नल.

मेजर जवानाला : अरे बाबा, तुम्ही या दारुच्या व्यसनाला सोडलं असत तर आता पर्यंत सुभेदार झाला असतां.
जवान : सर पण मी दारु प्यायल्यावर मला वाटते मी कर्नल झालो !

त्याग.

एकदा एका गावात महापुर आला. गावकर्‍यांना वाचवण्याचे बरेच प्रयत्न करण्यात येत होते. वाचवण्याचा वेग वाढवण्यास लष्कराला पाचारण करण्यात आले.
लष्कर आले व असा विचार करण्यात आला कि हेलिकॉप्टर आणण्याशिवाय मार्ग नाही.
हेलिकॉप्टर आले.
लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर खाली आल्यावर सोडलेल्या दोराला बरेच लोक लटकले. नंतर असे लक्षात आले कि दोर लटकलेल्या लोकांसाठी पुरेसा नाही. काही लोकांनी दोर सोडल्यास बरे होईल.
पण दोर सोडायला कोणीही तयार नव्हते.
शेवटी त्या दोराला लटकलेल्या एका बाईने सांगीतले ," सर्वच संकटाच्या वेळेस बाईनेच त्याग केलेला आहे. तर मी पण या संकट समयी तसाच त्याग करायला तयार आहे......."
आणि बाईंचे बोलणे संपताच सर्व पुरुषांनी टाळ्या वाजवायला दोर सोडून दिला !

व्यवस्थापन : Management !

एका संस्थेत व्यवस्थापक (Manager) बदलायची प्रक्रिया सुरु असते. नविन येणार्‍या व्यवस्थापकास जुन्या व्यवस्थापकासोबत काही दिवस काम करण्यास सांगण्यात येते.शेवटचा दिवस येतो. जुना व्यवस्थापक नव्यास तीन पाकिटे देतो व सांगतो, " काही अडचण आल्यास पहिलं पाकीट उघड व त्यात सांगितल्याप्रंमाणे निर्णय घे"सात आठ महिने सहज जातात व एक दिवस एक मोठ्ठा प्रश्न त्या नविन व्यवस्थापकापुढे उभा रहतो. बराच विचार केल्यावर त्याला आठवते कि जाताना जुन्या माणसाने तीन पाकिटे दिली होती. तो सांगीतल्याप्रमाणे पहिले पाकिट उघडतो. त्यात लिहीले असते सर्व दोष जुन्या माणसावर सोपवा. तो त्याप्रमाणे सर्व दोष जुन्या व्यवस्थापकावर लादतो. त्याचे प्रश्नं सुटतात.काही महिने गेल्यावर परत प्रश्न उभा रहतो. त्यात लिहील्याप्रमाणे तो निर्णय घेतो आणि सर्व सुरळीत चालू लागते.परत काही महिन्याने तो संकटात येतो. त्याला तिसरे पाकिट आठवते. तो ते पाकिट उघडतो व मजकूर वाचतो, " तीन पाकिटे तयार करायला लागा."

पुण्याचे दुकानदार

पुण्यातील दुकाने दुपारी १ ते ४ विश्रांती साठी बंद असतात . यादरम्यान दुकानदारांना कुणी त्रास देवू नये ही त्यांची लहानशी अपेक्षा असते.एकदा असंच दुकान बंद केल्यावर एका दुकानाला आग लागली. फायर ब्रिगेडचे बंब आले. दुकानातील आग विझवत असतांना एका जवानाने दुकान मालकाला फोन करुन आग लागल्याची खबर देण्याचा प्रयत्न केला असतांना दुकानदार म्हणाला, " आम्ही दुकान दुपारी १ ते ४ बंद ठेवतो हे दुकानाबाहेरील फलकावरुन आपल्याला कळलेच असेल, आम्ही दुपारी ४ वाजता दुकान उघडल्यावर आपणांस काय करायचे ते करा तरी परत फोन करायची तसदी घेवू नये" !

समोर शाळा आहे !

शालेतल्या बाई : राजू, तुला शाळेत यायला उशीर कां झाला ?
राजू : बाई, त्या रस्त्यावरच्या बोर्ड्मूळे.
बाई : कां ? असं काय लिहीलं होतं त्यावर ?
राजू : बाई त्यावर लिहीलं होत "हळू चला, समोर शाळा आहे"

ट्रक.

घराबाहेर ट्रक उभा राहिल्यावर तो फारच घाबरला.
त्याच्या मित्राने विचारले, " काय झालं, ट्रक आल्यावर तु इतका कां घाबरलास ?
तो म्हणाला," अरे काय सांगू, एकदा असाच एक ट्रक आला व त्यांनी माझ्या बायकोला पळवले. मी घाबरलो कारण मला वाटले ते तिला परत सोडायला आलेत कि काय !"

माणूसकी

एक चोर, चोरी करायला एका घरात शिरला.

घरात शोधाशोध केल्यावर त्याला तिजोरी सापडली.

तो ती तिजोरी फोडणार, तितक्यात त्याला तेथे एक सुचना दिसली.

"तिजोरी फोडायची गरज नाही. तिजोरी उघडायला ८९६६ डायल करा आणि बाजूची बटन दाबा"

चोर खुष झाला व त्याने ८९६६ डायल करुन बाजूची बटन दाबली. तिजोरी उघडली नाही पण थोड्यावेळात पोलीस तेथे हजर झाले.

पोलीस पकडून नेत असतांना तो चोर हताशपणे म्हणाला," आज माझा माणूसकी वरचाही विश्वास उडाला"

शुभेच्छा.

यशाची गुढी उंच जाऊ दे ! माझ्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नविन वर्ष आपणा सर्वांना सर्वोत्तम यश, संपदा व आरोग्य घेवून येवो, व आपल्या चेहर्‍यावरील हास्य कायम राहो हिच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.

पैसा.

एकदा सुप्रसिध्द विनोदी लेखक कै. चिं. विं. जोशी आपल्या मित्रासोबत कोठेतरी जात होते. त्यांनी समोरुन पै आडनावाचे आई-बाप व मुलगा असे तिघे येताना बघितले. तेंव्हा आपल्या मित्राला म्हणाले बघ पैसा येत आहे. तिन पै म्हणजे एक पैसा नां ?

गाढव

स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबध्दतेतून सुटल्यावर त्यांचे दौरे सुरु झाले. त्यामुळे कॉग्रेसवाले मत्सराने खदखदू लागले. त्यापैकी एक प्रसिध्द गांधीवादी श्री. जाजू म्हणाले," सावरकर सोलापूरला आले तर आम्ही त्यांची गाढवावरुन मिरवणूक काढू !" हे वृत्त आचार्य अत्रे यांना कळले. दुसर्‍या दिवशी ते पुण्यातील एका सभेत उत्तरले ," लोकहो, तो गाढव आपणास शोधावयास नको, आपण वीर सावरकरांना जाजूंच्याच खांद्यावर बसवू म्हणजे झाले !"

साखरेचा भाव.

एका बाईंना तातडीने साखर हवी होती.
त्या मगनलालच्या दुकानात गेल्या. दुकानावर पाटी होती "साखर १५ रु. किलो".
बाई मगनलालला म्हणाल्या दोन किलो साखर द्या.
मगनलाल, " बाई साखर संपली आहे, उद्या घेवून जा."
बाई जवळ्च्याच छगनलालच्या दुकानात गेल्या. तेथे साखर २० रु. किलो अशी पाटी होती.
बाई, " काहो, त्या मगनलालच्या दुकानात तर साखर १५ रु. किलो आहे, तुम्ही कसे २० रु. किलो देता ?"
छगनलाल, " बाई साखर २० रु. किलो आहे. संपल्यावर मी पण १५ रु. किलोची पाटी लावणार आहे !"